राजेंद्र गुंड
माढा : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माढा येथे घेण्यात आलेल्या बीटस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विठ्ठलवाडी येथील मेघश्री राजेंद्र गुंड व शिवम सुधीर गुंड यांनी आपापल्या गटात चमकदार कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला असून दोघांचीही तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे हे दोघेही सख्खे चुलत बहिण -भाऊ आहेत.
मेघश्री गुंड ही सध्या विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असून तिने केंद्रस्तरीय व बीटस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत लहान गटात उल्लेखनीय कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिची तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला सुप्रिया ताकभाते, आई मेघना गुंड, बंधू राजवर्धन गुंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.ती विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड यांची कन्या आहे.
शिवम गुंड हा सध्या सहकारमहर्षी गणपतराव साठे प्रशाला माढा येथे इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असून त्याने केंद्रस्तरीय व बीट स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या गटात चमकदार कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची निवड तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे. त्याला प्राथमिक शिक्षक सुधीर गुंड व सहशिक्षिका माधुरी गुंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दरम्यान, या दोघांचेही गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे, गट विकास अधिकारी डॉ.संताजी पाटील विस्ताराधिकारी विकास यादव, केंद्रप्रमुख विष्णू बोबडे,मुख्याध्यापक नागेश खेडकर,मुख्याध्यापक सुभाष लोखंडे,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.