(pimpri crime) पुणे : आयुष्यात मन लागत नाही मग जगण्यात अर्थ काय, अशा मनस्थितीत असे डायरीत लिहून पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. शनिवारी (ता. १८) सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
विरेन जाधव असे (वय-२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेन जाधव खाजगी कंपनीत कामाला होता. तो आई-वडिलांसोबत राहत होता, वडील कामानिमित्त परगावी गेले होते. तर आई घरातच होती. हातात नोकरी होती, पण पगार अधिकचा नाही. सुखसुविधा तर आहेत, पण आयुष्यात मन लागत नाही. मग जगण्यात अर्थ काय, अशा मनस्थितीत तो आला होता. असे डायरीत ही उल्लेख आढळले.
दरम्यान, यातूनच त्याने घराच्या बाहेर येऊन त्याने कॉमन पसेजमधून खाली उडी घेतली. यात त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pimpri Chinchwad Crime : कुख्यात गुंड बाळा वाघेरेच्या चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या !
Pimpri Chinchwad Crime : कुख्यात गुंड बाळा वाघेरेच्या चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या !