लोणी काळभोर (पुणे)- शाळेतुन घऱी परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या पाच ते सहा रोडरोमियोंना मुलींच्या पालकांनी बुधवारी (ता. 10) चांगलाच धडा शिकवल्याने, रोडरोमियोंना धडा शिकवणाऱ्या पालकांच्याबद्दल लोणी काळभोर, उरुळी कांचन परीसरात कौतुकांचे वातावरण आहे. लोणी काळभोर पोलिसांनीही घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत, वरील मुलींची छेड काढणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
एकीकडे मुलींच्या सुरक्षततेसाठी लोणी काभोर पोलिस थेऊरफाटा येथील घटनेतील मुलींची छेड काढणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत असतांना, दुसरीकडे मात्र छेडछाड प्रकरणातील रोडरोमियोंना पोलिसांच्या कचाट्यातुन सोडविण्यासाठी राजकीय नेते व कांही उद्योजक सरसावल्याने पृथ्वीराज मेमोरियस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेलच्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांच्यात असंतोषाचे वातावरण आहे.
दरम्यान, लोणी काळभोर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातुन घऱी परतणाऱ्या मुलींची छेडछाड करणाऱे पाच ते सहा रोडरोमियों हे कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची व थेऊर परीसरातील असल्याचे निस्पन्न झाले आहे. वरील पाच ते सहा रोडरोमियोंना मुलींच्या पालकांनी बुधवारी चांगलाच धडा शिकवला असला तर, याच रोडरोमियोंना मुलींना छेडत असल्याच्या कारणावरुन थेऊरफाटा परीसरात महिनाभऱापुर्वी स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिल्याची बाबही पुढे आली आहे. यामुळे पृथ्वीराज मेमोरियस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेलच्या कॅम्पसमधील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
लोणी काळभोर येथील एका नामांकित कनिष्ठ विद्यालयात थेऊरहुन ये-जा करणाऱ्या सहा मुलींना, त्यांच्याच विद्यालयातील तरुन मागिल कांही दिवसापासुन त्रास देत होते. मोटारसायकलवरुन पाठलाग करणे, विचीत्र हावभाव करणे, मुली प्रवास करत असलेल्या रिक्षाला मोटारसायकल आडवी मारुन मुलींनी आचकट-विचकट बोलणे हे प्रकार मागिल कांही दिवसापासुन मुली अनुभवत होत्या. सोमवारी (ता. 8) मुली विद्यालयात आल्या असता, त्याही दिवसी मुलींना वरील सहा रोडरोमियोच्या त्रासाला सोमोरी जावे लागले होते. वरील रोडरोमियोंचा त्रास वाढत चालल्याने, सहापैकी चार मुलीनी, रोडरोमियो करत असलेल्या छेडछाडीची माहिती पालकांना दिली होती.
दरम्यान बुधवारी विद्यालयाची वेळ संपल्यावर वरील सहापैकी चार मुली लोणी कॉर्नरवरुन रिक्षातुन थेऊरकडे निघाल्या होत्या. मुली रिक्षात बसताच, दोन मोटारसायकलवरुन पाच ते सहा जणांनी मुली बसलेल्या रिक्षाचा पाठलाग सुरु केला. मुली प्रवास करत असलेली रिक्षा थेऊर फाट्याजवळील एस4जी या हॉटेलजळ पोचताच, रोडरोमियोंनी दोनपैकी एक मोटारसायकल रिक्षाला आडवी मारुन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षात मुलींच्या बरोबर बसलेल्या मुलींच्या एका पालकांने मोटारसायकलला रिक्षातुनच लाथ मा्रुन मोटार सायकल वरील रोडरोमियोसह मोटार सायकलला खाली पाडले.
रिक्षातुन अचानक व अनपेक्षित हल्ला झाल्याने, खाली पडलेले दोघेही पळुन जाऊ लागले. त्याचवेळी रिक्षाच्या पाठीमागे असलेल्या मुलींच्या इतर पालकांनी रोडरोमियोंच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या पालकाकडुन हल्ला होत असल्याचे लक्षात येताच, मुलींना छेडण्यासाठी आलेले रोडरोमियों दिसेल त्या दिशेने पळत सुटले. पालकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र रोडरोमियो हाती लागु शकले नाहीत. पाच ते सहा तरुण पुढे पळतात, तर त्यांच्या पाठीमागे कांही पालक असा नजारा हॉटेलच्या आसपासच्या शेकडो नागरीक पहात होते.
पोलिस कारवाईनंतर “पुणे प्राईम न्यूज” शी बोलतांना बाबत माहिती देतांना चारपैकी एका मुलीचे पालक म्हणाले, लोणी काळभोर पोलिसांनी आमच्या मुलींना छेडणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन कारवाई केली ही बाब चांगली आहे. मात्र कांहीराजकीय नेते व स्थानिक नागरीक मात्र वरील मुलांच्या बाबत पोलिसात दिलेली तक्रार माघे घ्यावी यासाठी आमच्यावर दबाव टाकत आहेत. याबाबत वरीष्ठ अधिऱ्यांनी लक्ष घालुन योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे.