Indapur News : इंदापूर : मायलेकींचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हगारेवाडी (ता. इंदापूर) येथे घडली आहे. पोलिस पतीला घेऊन जात असताना नातेवाईकांनी त्याला चोप दिला आहे. या घटनेमुळे इंदापूरसह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अश्विनी सागर म्हस्के (वय २८) व सानवी सागर म्हस्के (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. तर सागर म्हस्के असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
इंदापूर तालुक्यात प्रचंड खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी आणि सागर हे नात्याने पतीपत्नी असून त्यांना सानवी नावाची ४ वर्षाची मुलगी आहे. (Indapur News) दरम्यान, अश्विनी आणि सानवी सानवी या दोघींचे मृतदेह राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच, वालचंदनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या दोघींचे मृतदेह खाली उतरून घेतले. (Indapur News) माय-लेकीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने हगारेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसंच, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
दरम्यान, वालचंदनगर पोलीसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या त्याच्यावर संशय असून त्याला ताब्यात घेऊन जात असताना संतप्त नातेवाईकांना सागर म्हस्के याला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. (Indapur News) मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी कशीबशी त्याची जमावाकडून सुटका करुन त्याला गाडीत बसवले व पोलिस ठाण्यात नेले. मात्र, ही आत्महत्या की हत्त्या याचा शोध वालचंदनगर पोलीस घेत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : हिंगणगावात चक्क तलावातील माशांची चोरी; तिघांविरोधात गुन्हा दाखल