Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : इंदापूर तालुक्यासाठी निरा डावा व खडकवासला कालव्यातून रब्बीसाठी २ आवर्तने : हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 October 2023, 15:27

दीपक खिलारे

Indapur News  : इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी निरा डावा कालवा व खडकवासला कालव्यामधून रब्बीसाठी प्रत्येकी २ आवर्तने सोडण्यात येणार आहेत. सणसर कटमधून १.४० टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतीला मिळणार आहे. तसेच शेटफळ तलाव १०० टक्के क्षमतेने भरून घेण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शुक्रवारी (ता. २०) दिली.

पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अनेक मागण्या केल्या. या मागण्यांसंदर्भात झालेल्या निर्णयांची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, येत्या १० नोव्हेंबरपासून निरा डावा कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन सुरू होईल. (Indapur News ) तसेच शेटफळ तलाव सध्या ५० टक्के भरलेला असून, पाठीमागील कालवा सल्लागार समितीमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे १०० टक्के क्षमतेने तलाव भरून देण्यात यावा, अशी मागणी बैठकीत केली. त्यावर या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच निरा डावा कालव्यामधून वरकुटे खुर्द, तरंगवाडी, झगडेवाडी, वाघाळा टॅंक, वालचंदनगरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घोलपवाडी नळ पाणी योजना पिण्याचा पाणी प्रश्न या सर्व ठिकाणी आगामी पावसाळा येईपर्यंत पाणी देण्याची व्यवस्था झाली पाहिजे, अशी मागणी बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

 

इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून २८ फेब्रुवारीपर्यंत २ आवर्तने मिळणार आहेत. त्यानंतर उन्हाळ्यात इंदापूर तालुक्याला पाणी न देण्याचा टिप्पणी होती. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्यावरील मदनवाडी ते तरंगवाडी दरम्यानच्या १८ पाझर तलावांसाठी उन्हाळ्यात २ टीएमसी पाण्याची मागणी बैठकीत केली. त्यावर पालकमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका आयुक्तांची चर्चा करून पाण्याचे फेरवाटप करण्याचा निर्णय घ्या, असे नमूद केले. (Indapur News ) तसेच तरंगवाडी तलावातून इंदापूर शहराला पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे, अशी मागणी बैठकीत केली.

उजनीतील पाणी प्रदूषित झाल्याने मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे उजनी पाणी शुद्धीकरण प्रकल्प आराखडा राबवावा तसेच उजनी मध्ये मत्स्य बीज सोडून मत्स्य व्यवसाय वाढवावा, अशी सूचना बैठकीत मी केली. (Indapur News ) या सर्व मागण्यावर बैठकीस सकारात्मक चर्चा झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

सणसर कटमधून पाण्याच्या मागणीला यश : हर्षवर्धन पाटील
सणसर कटच्या प्रकल्प अहवालामध्ये ३.७० टीएमसी पाणी देण्याची तरतूद आहे. मात्र, गेली ९ वर्षांपासून सणसर कटमधून एक थेंबही पाणी आले नाही. त्यामुळे सणसर कटमधून हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी सातत्याने केली. आजच्या बैठकीमध्ये सणसर कटमधून १.४० टीएमसी पाणी नीरा डावा कालवा लाभ क्षेत्रासाठी देण्याचा निर्णय करून घेतला. त्यामुळे २२ गावांमधील शेतीलाही फायदा होणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अंकिता पाटील-ठाकरे यांची निवड

Indapur News : निरा भिमा कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ संपला, कारखाना सुस्थितीत : हर्षवर्धन पाटील

Indapur News : कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचा जीवन प्रवास आदर्शवत; हर्षवर्धन पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

Bhor News : ना तलाठी, ना बोर्ड, ना तक्रार पेटी... किकवी तलाठी कार्यालयच गायब?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.