Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 November 2026, 20:44

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. हॉटेलमधील स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळल्याने तीन नामांकित हॉटेल्सचे अन्नविक्री परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तर अन्य पाच हॉटेल्सना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ऐन पर्यटन हंगामात झालेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या कठोर तपासणी मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. एफडीएचे सहआयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महाबळेश्वरमधील विविध हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांची आणि रेस्टॉरंटची अचानक तपासणी केली.

या पाहणीदरम्यान काही हॉटेल्समध्ये स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यानंतर प्रशासनाने संबंधित हॉटेल्सविरोधात कारवाई केली.

प्रशासनाने हॉटेल इव्हरशाईन (महाबळेश्वर), हॉटेल रामसुख (क्षेत्र महाबळेश्वर) आणि हॉटेल ब्राईटलॅण्ड या तीन नामांकित हॉटेल्सचे अन्नविक्री परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. त्यामुळे या हॉटेल्समधील खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत. याशिवाय अन्य पाच हॉटेल्सना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांना आढळलेल्या त्रुटी लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे. अनेक हॉटेल्सचे बुकिंग आधीच पूर्ण झालेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही पर्यटकांना ऐनवेळी पर्यायी हॉटेल्स शोधण्याची वेळ आली, तर काहींना पर्यटनाचा बेत बदलावा लागल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कारवाईबाबत हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने नियमित तपासणी करून त्रुटी आढळल्यास पूर्वसूचना द्यावी आणि त्या सुधारण्यासाठी संधी द्यावी, अशी भूमिका काही व्यावसायिकांनी मांडली आहे. मात्र, अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याने प्रशासनाच्या या कारवाईकडे पर्यटकांचेही लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp