Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 15 November 2026, 20:12

राहुलकुमार अवचट

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक तसेच अन्य विभागांच्या योजनांचा लाभ थेट मिळावा, यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणालीतील माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कृषी व अन्य विभागांच्या विविध योजनांची मदत शेतकऱ्यांपर्यंत सातत्याने पोहोचविण्यात येत आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, अनुदान व अन्य लाभ देण्यात येतात. यापूर्वीही शासनाने विविध संकटांच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसी व फार्मर आयडीचे महत्त्व अधिक वाढले आहे. पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे.

ॲग्रीस्टॅक प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती एकत्रित व अद्ययावत करण्यात येत असून, विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरत आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच फार्मर आयडीची प्रक्रिया पूर्ण केल्यास योजनांचा लाभ मिळण्यातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

ई-केवायसी किंवा फार्मर आयडी तयार करताना शेतकऱ्यांना काही तांत्रिक अथवा अन्य अडचणी येत असल्यास राज्य शासनामार्फत त्या सोडविण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणीमुळे प्रक्रिया अपूर्ण ठेवू नये. संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून आपली माहिती अद्ययावत करावी व आवश्यक पडताळणी पूर्ण करावी.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी ई-केवायसी व फार्मर आयडी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करण्यासाठी जवळच्या सीएससी (नागरी सुविधा केंद्र) येथे आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकासह जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा. राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp