Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 November 2026, 20:08

पुणे : धार्मिक स्थळांसोबतच ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी आता एसटीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगाराने ‘एसटी संगे तीर्थाटन’ ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात महाकाल दर्शन, पाच ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तिपीठे आणि अष्टविनायक अशा नऊ विशेष सहलींचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने बसची संख्या आणि फेऱ्यांमध्ये वाढ केली होती. त्यानंतर आता भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष तीर्थाटन सहली सुरू करण्यात आल्या आहेत. स्वारगेट आगारातून १२ नोव्हेंबरपासून या सहलींना सुरुवात झाली असून, कोकण दर्शनासह काही सहली यापूर्वीच पार पडल्या आहेत.

– १६ ते २१ नोव्हेंबर : उज्जैन, ओंकारेश्वर आणि इंदूर दर्शनाची सहल.
– १७ आणि १८ नोव्हेंबर : बाळूमामा आदमापूर सहल. यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, नरसोबाची वाडी आणि खिद्रापूर येथे भेट देता येईल.
– १९ ते २२ नोव्हेंबर : पाच ज्योतिर्लिंग दर्शन. औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या ठिकाणांचा समावेश आहे.
– १९ ते २२ नोव्हेंबर आणि २७ ते ३० नोव्हेंबर : बदामी-हंपी पर्यटन सहल.
– २३ ते २७ नोव्हेंबर : तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी येथील साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन.
– २७ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर : शेगाव, माहूर आणि लोणार सरोवर सहल.
– २८ आणि २९ नोव्हेंबर : अष्टविनायक दर्शन सहल.

या तीर्थाटन सहलींमध्ये महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे. तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबासह देवदर्शन आणि पर्यटन करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे.

या योजनेतून धार्मिक स्थळांसोबतच ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांनाही भेट देता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वारगेट आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post

"कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा" मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp