Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : निरा भिमा कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ संपला, कारखाना सुस्थितीत : हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 11:31

दीपक खिलारे

Indapur News : इंदापूर : निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ आता संपलेला असून, कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीमध्ये आला आहे. कारखाना आर्थिक संकटातून बाहेर आल्याने आगामी काळात निरा भिमाचा समावेश राज्यातील टॉप 10 कारखान्यामध्ये निश्चितपणे होईल, असा विश्वास कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.13) व्यक्त केला.

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात

शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2022-23 ची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. (Indapur News ) प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 17 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन हर्षवर्धन पाटील यांनी केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. प्रारंभी श्रद्धांजली ठराव कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी मांडला. त्यानंतर सभेचे व कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले.

 

तसेच ते म्हणाले, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे कामकाज केले जात आहे. कारखान्याची आजची रौप्यमहोत्सवी म्हणजे 25 वी वार्षिक सभा आहे. या 25 वर्षामध्ये कारखान्यास सहकार्य करणारे सभासद, शेतकरी बांधव, हितचिंतक या सर्वांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो. (Indapur News ) भाऊंनी कारखाना स्थापन करण्याची सूचना केली व आपण त्यास आपण सर्वांनी मूर्त रूप दिले. भाऊंनी घालून दिलेल्या संस्कारानुसारच आपली सर्वांची वाटचाल सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय, गेल्यावर्षीच्या 2022-23 च्या हंगामात 5,64,682 मे.टन ऊस गाळप केले व साखर उतारा 10.02 टक्के आला आहे. या हंगामात गाळप क्षमता 3500 मे.टन असताना कारखान्याने एका दिवसात 6000 मे.टन ऊस गाळपाचा उच्चांक केला. तर प्रतिदिनी सरासरी 5,230 मे.टन क्षमतेने हंगामात गाळप केले. (Indapur News ) तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून 2 कोटी 60 लाख 15 हजार 655 युनिट वीज एक्सपोर्ट केली. त्याचबरोबर इथेनॉलचे 97 लाख 26 हजार 929 लि. उत्पादन निघाले. प्रतिदिनी इथेनॉल उत्पादन सरासरी उत्पादन 60 हजार 688 लि. एवढे निघाले. तर बायोगॅस प्रकल्पामुळे 3578 मे.टन बगॅसची बचत झाली, असेही त्यांनी म्हटले आहे.

कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता लवकरच अदा केला जाईल. कारखान्याचे भांडवल रुपये 6 कोटी एवढे असताना सध्या कारखान्याची मालमत्ता तब्बल रुपये 352 कोटींची झाली आहे. (Indapur News ) गेल्या हंगामात ऊस बिलाचा पहिला हप्ता देण्यास विलंब झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.

इथेनॉल प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी केंद्राचे सहकार्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार मिळत आहे. (v) तसेच इथेनॉल प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारचे सहकार्य करत आहे. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची सध्याची प्रतिदिनी असलेली 30 हजार लिटरची क्षमता वाढून 1 लाख 5 हजार लिटर होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले

कारखान्याचा 25 वर्षांच्या इतिहास पाहिला तर अनेक अडचणीवर आल्या. मात्र, या अडचणींवर यशस्वीपणे मात करत लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या कारखान्यामुळे अनेक संसार उभे राहिले, प्रगती झाली, याचा आनंद होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस देणार

सेंद्रिय खत प्रकल्पातून 16207 बॅगांची विक्री करण्यात आली. बायोकंपोस्ट प्रकल्पातून 5315 मे.टन बायो-कंपोस्ट खताची शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली. डिझेल व पेट्रोल पंप विक्रीतून 7 कोटीची उलाढाल झाली आहे. कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट 23 पर्यंतचा पगार झाला असून, कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस दिला जाईल, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

या सभेमध्ये कारखान्यास एनसीडीसीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळाचे सहकार्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव गोविंदराव रणवरे यांनी मांडला. त्यास तानाजीराव नाईक यांनी अनुमोदन दिले.

यावेळी विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अनिल पाटील, तानाजी हांगे, विकास पाटील, दत्तात्रय शिर्के, मनोज पाटील, किरण पाटील, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबन देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार व मान्यवर उपस्थित होते. सभेचे अहवाल वाचन कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले. आभार संचालक प्रतापराव पाटील यांनी मानले.

निरा भिमा कारखाना काटा पेमेंट करणार – हर्षवर्धन पाटील

निरा भिमा कारखाना आगामी सन 2023-24 च्या गळीत हंगामात काटा पेमेंट करणार आहे. या हंगामात कारखान्याने 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या गुणवत्तेचा ऊस देऊन कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचा जीवन प्रवास आदर्शवत; हर्षवर्धन पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा

Indapur News : जेवण बनवण्याच्या कारणावरून वाद ; रागातून कोयत्याने वार करून खून, इंदापूर तालुक्यातील घटना..

Indapur News : मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्देवी : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14
Next Post

Pune News : जप्त केलेल्या ५ कोटींच्या अंमली पदार्थांची होळी : पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.