Weather Update: राज्याच्या हवामानात बदल जाणवत आहेत. कोकणात कोरडं आणि ढगाळ वातावरण दिसत आहे. तर पुण्यात सकाळी निरभ्र व तीव्र ऊन असेल मात्र दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे. हवामान विभागाने विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला असून गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज(27 एप्रिल), सातारा, घाटपरिसर, सांगली, कोल्हापूर, घाटमाथ परिसर, सोलापूर, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो.
तसेच उद्या 28 एप्रिल ला चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विभागाकडून या जिल्ह्यात यलो अलर्द देण्यात आला आहे.
तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या तीन जिल्ह्यांत हवामान विभागाने अति मुसळधार पाऊस अन् गारपिटीचा इशारा आज दिला आहे.