पुणे प्राईम न्यूज: आज क्वचितच कोणी असेल ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, पण जीमेल वापरत नाही. तुम्ही तुमचा जीमेलचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करत असाल, परंतु काही फीचर्स असे आहेत की, ज्यांची फार कमी लोकांना माहिती आहे. अनेक वेळा जीमेलवर येणारे सर्व ई-मेल दुसऱ्या आयडीवर फॉरवर्ड व्हावेत असे आपल्याला वाटते, पण हे करण्याची पद्धत आपल्याला माहीत नसते. पण, ते शक्य असते. आजच्या या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला जीमेलवर येणारे सर्व ई-मेल आपोआप कसे फॉरवर्ड करायचे ते सांगणार आहोत.
तुम्ही तुमच्या जीमेल खात्यात सेटिंग करून सर्व मेल दुसऱ्या आयडीवर फॉरवर्ड करू शकता. एकदा ही सेटिंग सक्रिय झाल्यानंतर, सर्व येणारे ई-मेल तुम्ही दिलेल्या नवीन ई-मेल आयडीवर पाठवले जातील. ही सेटिंग तुम्ही मोबाइल ॲपमध्ये करू शकत नाही. सेटिंगसाठी तुम्हाला डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम ब्राउझर वापरावे लागेल.
तुमच्या संगणकाच्या ब्राउझरमध्ये जीमेल उघडा आणि तुमच्या खात्यात लॉग इन करा. आता उजव्या बाजूला दिसणार्या सेटिंग्ज आयकॉनवर क्लिक करा. आता फॉरवर्डिंग किंवा POP/IMAP टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा. आता फॉरवर्डिंग ॲड्रेसमध्ये ई-मेल आयडी टाका, ज्यावर तुम्हाला तुमचे सर्व ई-मेल फॉरवर्ड करायचे आहेत. ई-मेल आयडी टाकल्यानंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
यानंतर एक पॉपअप विंडो उघडेल ज्यामध्ये ‘नेक्स्ट’ असे लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करा. यानंतर, आपण मेल फॉरवर्ड करण्यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर एक पुष्टीकरण मेल येईल. आता त्या पुष्टीकरण मेलमधील लिंकवर क्लिक करा आणि दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रोसेस करा.
आता तुमच्या जुन्या जीमेलवर परत जा आणि पेज रिफ्रेश करा. आता ‘कीप जीमेल्स कॉपी इन द इनबॉक्सवर क्लिक करा आणि शेवटी दिलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा. तुम्ही ही सेटिंग कधीही या पद्धतीने बदलू शकता.
हेही वाचा:
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी केली वाढ