Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : खळबळजनक! कामगारांना नग्नावस्थेत झाडू, बांबू, मच्छरच्या बॅटने अमानुष मारहाण करत, रात्रभर नाचवले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 October 2023, 15:32

Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. तेरा शेठ हमारा पैसा कब देनेवाला है, अशी विचारणा करत मालकाने पैसे बुडवल्याच्या रागातून त्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने रात्रभर खोलीत डांबून, त्यांना नग्न करत बांबू आणि झाडूने मारत रात्रभर नाचवले. एवढ्यावरच न थांबता त्यांना मच्छर मारायच्या बॅटने करंट देण्यात आला. या छळापासून वाचण्यासाठी कामगारांनी इमारतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एका कामगाराचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरात नुकताच उघडकीस आला आहे.

पळून जाण्याच्या प्रयत्नात एका कामगाराचा मृत्यू

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी कामगार गुफरान जाऊद्दीन खान याने छळणूक करणाऱ्या टोळक्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुफरान जाऊद्दीन खान (वय १९, रा. त्रिमूर्ती चौक, आंबेगाव पठार) हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून, मागील ३ महिन्यांपासून तो कामानिमित्त नातेवाईकांकडे आला आहे. त्याच्या नातेवाईकाने फिर्यादी खान याला करीम खान यांच्या नुराणी केटरर्स, आंबेगाव पठार, त्रिमूर्ती चौक येथे बिर्याणी बनवण्यासाठी कामाला लावले होते. (Pune News) कामावरील फिर्यादीचा सहकारी लाल मोहम्मद खान हे दोघे केटरिंगच्या गाळ्यातच झोपायचे, तर त्यांचे मालक करीम खान त्यांच्या कुटुंबासोबत गाळा असलेल्या बिल्डिंगमध्ये राहतात. लाल महम्मद खान याने स्वतःचे बिर्याणीचे दुकान टाकले होते. तो अधून-मधून येथील दुकानावर येऊन काम करत असे.

 

फिर्यादीचे शेठ करीम खान यांनी त्याला सांगितले की, मी मुंबईला चाललो असून, उद्या परत येईन. कोणी विचारल्यास शेठ मुंबईला गेल्याचे सांग. त्यादिवशी दिवसभर फिर्यादीने बिर्याणी विकली. रात्री ११ च्या दरम्यान राकेश खोपडे फिर्यादीकडे आला.(Pune News)  तुम्हारा शेठ किधर है, अशी विचारणा केली. त्यावर करीम शेठ मुंबई गये है. कल सुबह आ जायेंगे, असे सांगितले. त्यावर राकेश म्हणाला की, तुमचा शेठ पळून गेला आहे, तो माझे ३ लाख ५० हजार रुपये देणार होता. जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत तुला आणि लाल मोहम्मद दोघांनाही माझ्यासोबत राहावे लागेल असे सांगून तो दोघांना सोबत घेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये गेला.

तेथे पुन्हा राकेशच्या मुलांनी, दादागिरी केली. आम्ही दोघे फक्त कामगार आहोत. आम्हाला या प्रकरणात ओढू नका, असे फिर्यादी याने सांगितले. त्यावर राकेश खोपडे व त्याच्या मुलांनी दोघांना बेदम मारहाण केली. एका बिल्डिंगमध्ये नेऊन, दोघांचे फोन काढून घेतले. बाहेरून खोली बंद केली. थोड्या वेळाने सात-आठ जणांनी मिळून खान याला कोपऱ्यात बसायला सांगितले. आठ जणांपैकी एकाने लाल मोहम्मदला त्याचे कपडे काढण्यास सांगितले. (Pune News) त्यावर लालने कपडे काढण्यास नकार दिला. त्याला बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडले. लालने कपडे काढल्यानंतर टोळक्याने मोबाईलवर गाणे लावले आणि त्याला बांबूने, हाताने, झाडूने मारहाण करत नाचायला लावले. मच्छर मारायच्या बॅटने चटके दिले. थोड्या वेळाने फिर्यादी खान यालाही कपडे उतरून नाचायला सांगितले. त्यालाही झाडूने, बांबूने मारहाण केली. पैसे मिळत नाही तोपर्यंत असेच चालेल असे म्हणत, पहाटे ६ वाजेपर्यंत दोघांना मारहाण केली. सकाळी राकेश खोपडेच्या मुलाने लालला त्याचा मोबाईल देऊन करीम खानला फोन करायला सांगितले आणि साडेनऊपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर दोघांना ठार मारू असे करीमला सांगण्यास सांगितले.

दरम्यान, टोळक्याच्या छळामुळे घाबरलेल्या कामगाराने पळून जाण्याच्या प्रयत्नात इमारतीवरून खाली उडी मारली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. (Pune News) या प्रकरणी फिर्यादी खान याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विविध कलमांन्वये टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : भाजप नेत्याच्या मदतीनेच ललित पाटीलने पलायन केले; आमदार रविंद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा

Pune News : फ्लॅटवर जागामालकाचे अतिक्रमण; बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Pune News : येरवड्यातील जागेचा प्रस्ताव गृह विभागाचा, माझा त्याच्याशी संबध नाही; बोरवणकरांच्या आरोपांना अजित पवारांचे सविस्तर उत्तर…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33
Next Post
know about How to automatically forward all emails in Gmail

कामाची गोष्ट: तुम्हाला सर्व ई-मेल आपोआप फॉरवर्ड करायचेत, मग अशी करा जीमेलमध्ये सेटिंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.