Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरे-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात! बसचा टायर फुटल्याने लक्झरी बस आयशरला धडकली; दोन्ही चालक गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली!

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 15 November 2026, 17:56

न्हावरे : न्हावरे-शिक्रापूर रस्त्यावर उरळगाव परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रविवारी (ता.१५) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास खाजगी लक्झरी बस आणि आयशर टेम्पो ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. बसच्या पुढील चालकाच्या बाजूचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. या विचित्र अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या अपघातात लक्झरी बसचालक मुंजाजी दशरथ आंधळे (वय २३, रा.येळम, ता.परळी, जि.बीड) आणि आयशर टेम्पोचालक पोपट निवृत्ती भोंडवे (वय ३८, रा.सुपा, ता.बारामती, जि.पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खाजगी बस न्हावरे मार्गे बीडच्या दिशेने जात असताना अचानक तिचा पुढील टायर फुटला. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बसची शिक्रापूरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक बसली. दरम्यान, अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी न्हावरे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक शिंदे आणि पोलीस अशोक चितारे यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

विशेष म्हणजे, अपघातग्रस्त लक्झरी बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. भीषण अपघातातून जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेचा पुढील तपास न्हावरे पोलीस करीत आहेत.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरे-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात! बसचा टायर फुटल्याने लक्झरी बस आयशरला धडकली; दोन्ही चालक गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली!

Sunday, 15 November 2026, 17:56

पुणे पोलीस दलात खळबळ! ३० लाखांच्या जबरी चोरीप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड

Sunday, 15 November 2026, 17:29

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

Sunday, 15 November 2026, 16:30

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

Sunday, 15 November 2026, 16:29

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09

सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ! चांदी थेट 15 हजारांनी स्वस्त; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Sunday, 15 November 2026, 15:55
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp