सुरज थोरात
कराड : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 0 ते 5 पाच वर्षाखालील बालकांना रविवारी (ता. ३) पोलिओचा डोस देण्यात आला.
या पल्स पोलिओ बुथचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, तळमावले ग्रामपंचायतचे सरपंच सुरज यादव तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी फिरती पथके कार्यरत होती. जिल्ह्याप्रमाणेच तालुका आणि ग्रामीण स्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी आपली यंत्रणा सज्ज केली होती. ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ ही यंदाच्या पल्स पोलिओ मोहिमेची टॅगलाईन आहे.
नागरिकांनी अफवा, अंधश्रद्धेला बळी न पडता बालकांना पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना मोठ्या प्रमाणात पोलिओ लसीकरण करण्यात आले. यावेळी तळमावले परिसरातील सर्व ऊसतोड मजुर, रस्त्यावर काम करणारे मजूर याच्या झोपडीमध्ये जाऊन 0 ते 5 वयोगटातील सर्वाना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर बी. पाटील, डॉ. अभय पवार, डॉ. नितीन वांगीकर, आरोग्य सहाय्यक शरद कांबळे, जामसिंग पावरा, आरोग्य सेवक रोहित भोकरे, स्वप्निल कांबळे, विलास फाळके, आरोग्य सेविका रंजना कुंभार, विद्या लोहार, सोनाली परिट, सुप्रिया पवार, प्रियांका गारदी समुदाय आरोग्य अधिकारी धैर्यशिल सपकाळ, नितीन माने, अकबर मुल्ला, सुप्रिया यादव, पाटील मँडम, कोमल महादर, निलम डुबल, सुजाता सातपुते, सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, परिचारीका उपस्थित होते.