IND vs ENG मुंबई: भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलही इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने गुरुवारी याला दुजोरा दिला. राहुल शेवटच्या कसोटीत पुनरागमन करेल अशी अटकळ होती. दुखापतीमुळे राहुल पहिली कसोटी खेळल्यापासून संघाबाहेर आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी आकाश दीप खेळला होता. आता बुमराहच्या पुनरागमनाने संघ मजबूत झाला आहे. याशिवाय बीसीसीआयनेही मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबतही महत्वाचे अपडेट दिले आहे.
राहुलबद्दल बीसीसीआय काय म्हणाले?
सुंदरबद्दल बीसीसीआय काय म्हणाले?
बीसीसीआयने सांगितले, वॉशिंग्टन सुंदरलाही संघातून मुक्त करण्यात आले आहे. २ मार्चपासून मुंबईविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत तो तामिळनाडू संघात सामील होईल. गरज भासल्यास रणजी सामने पूर्ण झाल्यानंतर पाचव्या कसोटीसाठी तो भारतीय संघात सामील होईल. तसेच बोर्ड म्हणाले की, 26 फेब्रुवारीला मोहम्मद शामीवर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्याच्या उजव्या टाचेत समस्या होती. तो बरा होत असून लवकरच त्याची पुनर्वसन प्रक्रिया सुरू करण्यासाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सामील होणार आहे.
पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.