मुंबई: गेल्या आठवड्यात सुमारे ४% ची लक्षणीय घसरण झाल्यानंतर, आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत सध्या प्रति १० ग्रॅम ८७,२०० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९५,१३० रुपये आहे. तथापि, चांदीच्या किमती १०० रुपयांनी घसरून ९६,९०० रुपये प्रति किलोग्रॅम झाल्या आहेत. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आणि व्यापार तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमती सुमारे १% ने वाढल्या आहेत. अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. १९ मे २०२५ रोजी, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम९२३० आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८८८० इतके आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर, सोने ०.६५% वाढून ९३,०४२ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे, तर चांदी ९५,५७० रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड, आयात शुल्क, कर आणि विनिमय दरातील चढउतारांमुळे किंमती प्रभावित होत आहेत.







