पुणे : बस धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या कॉम्प्रेसरला अर्थींग नसल्याने वीजेचा धक्का लागून एका कामगाराचा मृत्यु झाल्यची घटना घडली आहे. संतोष पांडुरंग माळवदकर (वय-४९, रा. पिसोळी) असं मृत्यु झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगर येथील सिंहगड सिटी स्कुलमध्ये १८ ऑक्टोबर रोजी घडली होती.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सिंहगड सिटी स्कुलचे कॅम्पस संचालक धनंजय तुकाराम मंडलीक, संस्थेचे ट्रान्सपोर्ट सुपरवायजर दौलत दत्तात्रय ढोक, इलेक्ट्रीक सुपरवायजर इस्टेट सुपरवायजर विजय संपत कुंभार तसेच सिंहगड संस्था व संस्थेतील इतर संंबधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत त्यांची पत्नी सुनिता संतोष माळवदकर (वय-४१, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती संतोष माळवदकर हे स्कुलची बस धुवत होते. सदोष कॉम्प्रेसर व वायरींगमधून तसेच त्या ठिकाणी आर्थिग नसल्याने त्यांना वीजेचा जोरदर धक्का बसला. या घटनेत त्यांचा मृत्यु झाला. या कॉम्प्रेसर व विद्युत जोडणीबाबत योग्य काळजी न घेतल्याने संस्थेच्या पदाधिकार्याचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने संतोष माळवदकर यांचा वीजेचा धक्का लागून मृत्यु झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.