गणेश सूळ
Daund News : केडगाव : प्रत्येक वेळी प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी शक्य तिथे कापडी पिशव्या वापरल्या तर पर्यावरणाच्या प्रदूषणास मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा सल्ला खुटबाव ( ता. दौंड ) येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. (Use cloth bags, save the environment: Bhairavanath Education Board Vice President Bhausaheb Dhamdhere)
थोरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना भाऊसाहेब ढमढेरे यांनी वरील सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे.(Daund News) यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जगदीश आवटे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने बनविण्यात आलेल्या कापडी पिशव्या देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. (Daund News)या उपक्रमाच्या संयोजिका प्रा. योगिता दिवेकर यांनी कापडी पिशव्यांच्या वापराबाबतची संकल्पना स्पष्ट केली.
दरम्यान, वैष्णवी बंड, कीर्ती बधे, आकाश कोळपे, ओंकार सुतार, सूरज शेळके, कार्तिकेय कोंडे तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला.(Daund News)
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निलेश थोरात, निलेश डोंबाले,सागर जाधव ,गणेश शिंदे यांनी सर्वोतोपरी मदत केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पल्लवी तांबोळी यांनी केले. (Daund News) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकन्या अवचट व साई दीक्षित यांनी केले. तर आभार प्रा. तेजस टेंगले यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : “अमृत भारत” योजनेत दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश; जंक्शनचा होणार विकास