लेखन – सागर गायकवाड (शिक्षक-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडगुलवाडी ता. शिरूर)
शिरूर : Shirur – माणसाची बदलती जीवन शैली, शेतीत रासायनिक कीटकनाशकांचा अतीवापर, मोबाईलची रेंज आणि टॅावर, सिमेंटच्या इमारती यामुळे चिमंण्यासह अनेक पक्षांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पक्षी ही आपली नैसर्गीक संपत्ती आहे. पक्षांच्या विविध प्रजाती जतन करणे आपले कर्तव्य आहे. (Shirur ) झाडांची पानगळ सरली आणि नवी पालवी आली की नव्या नवतीच्या झाडांवर लहान मोठे पक्षी दिसू लागतात. ते नवे घरटे बांधण्याच्या कामालाही लागतात.या पक्षांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी अन्न पाणि देऊन या पशुपक्षांना सभाळणे गरजेचे आहे. (Shirur )
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. या कडक उन्हात पाण्यावाचून प्राणी, पक्षांचा मृत्यूदरही वाढतच असतो. यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र दिसते. एरवी सतत अंगणात येणारी, एवढ्याशा पाण्यात स्नान करणारी, आणि वेळ प्रसंगी जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी अलीकडे गायबच झाली आहे. निसर्ग साखळीत प्राणी पक्ष्यांच असलेल महत्व ओळखून त्यांचे संगोपन गरजेचे आहे. गेल्या काही वर्षापासून परीसरात जिथे जागा मिळेल तिथे विविध झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले आहे. झाडांचे संगोपन केल्यामुळे झाडांवर विविध पक्ष्यांचा राबता वाढला आहे.
शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले आहे. या ठिकाणी पक्षांनी देखील रेंगाळावे यासाठी अन्न व पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्राण्याबाबत मैत्रीची भावना निर्माण होईल असे उपक्रम देखील राबविता आले पाहिजे. या पक्षांच्या अन्नाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.
सर्वांचीच नैतिक जबाबदारी…
नैसर्गीक समतोल राखण्यासाठी पशु, पक्षांची भुमीका महत्वाची आहे. त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही नैतीक जबाबदारी सुद्धा आहे. ही जाणीव बाळगून या चिमुकल्यांनी मातीच्या कुंड्या, रिकाम्या बाटल्या, ज्यात पाणी ठेवता येईल. अशा पण टाकाऊ वस्तूंपासून पाणवट्या तयार करून त्या झाडांना बांधून, त्यात दररोज पाणी टाकून पक्षी पाणपोई उपक्रम सुरू केला पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट ऐकू येऊ शकतो. त्यातून निसर्गाचे जतन होते.
शब्दांकन : युनूस तांबोळी