युनूस तांबोळी
Shirur News ; शिरूर : सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अधिवेशन का घेत नाही, म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने शिरूर तालुक्याच्या कवठे येमाई येथे ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला स्थानिक पुढाऱ्यांनी भेट दिली नाही. यामुळे पुढारी गायब झाले की काय? अशी प्रतिक्रिया मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
पण स्थानिक पुढारीच गायब…
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे सलग तिसऱ्या दिवशी हे उपोषण तीव्र झाले असून, आमरण उपोषण करण्याची तयारी आहे. जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी हे उपोषण सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाने गठीत केलेल्या शिंदे समितीला १० हजार पुरावे सापडले असले, तरी समिती का निर्णय देत नाही? ज्या जातींचा आरक्षणात समावेश केला, त्यांना नेमके कोणते निकष लावले, हे सरकारने सांगावे. (Shirur News ) आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी झोपचे सोंग घेतलेल्या शासनाला जाग यावी यासाठी कवठे येमाई (शिरूर) येथे सकल मराठा समजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केल्याचे सांगितले.
या वेळी ”संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” , “एकच मिशन मराठा आरक्षण” , “कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही” , “आरक्षण देत नसलेल्या सरकारच करायच काय, खाली डोके वर पाय” , “एक मराठा लाख मराठा” , “आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा खुर्च्या खाली करा”, “जय भवानी… जय शिवाजी” अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून सोडला.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सुरू ठेवणार आहोत. (Shirur News ) वेळप्रसंगी येथे आमरण उपोषण करणार आहोत. पण समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
– राजेश सांडभोर, मराठा समाज कार्यकर्ताआमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. सर्व क्षेत्रात कमी गुणवत्ता असणाऱ्यांना स्थान मिळते; पण आमच्या मुलांच्या गुणवत्तेला स्थान नाही. (Shirur News ) यासाठी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. सगळ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजेत.
– हौशीराम मुखेकर, मराठा समाज कार्यकर्ता
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मराठा आरक्षणप्रश्नी गावोगावी झळकले नेत्यांना गावबंदीचे फलक
Shirur News : निमगाव म्हाळुंगी येथे मराठा समाजाचा एकच निर्धार ‘आधी आरक्षण, मग इलेक्शन’