Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : तडम ताशा, डफाचा निनाद अन् आई उदे गं अंबाबाईच्या जयघोषात श्री येमाई देवीचा पालखी सोहळा संपन्न

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 29 October 2023, 15:07

Shirur New : शिरूर : तडम ताशा अन् डफाचा निनाद…, सनईच्या सुरावर ढोल-ताशांची जुगलबंदी…, पारंपरिक भुतेबाबा…, विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवलेली पालखी… त्यात श्री येमाई देवीचा सजविलेला मुखवटा…, दारोदारी थांबवून पूजा करत भाविकांनी दर्शनासाठी केलेली गर्दी, त्यातून आई उदे गं अंबाबाईच्या जयघोषाने गोंधळ्याच्या संबळावर झालेल्या आरतीने कवठे येमाई (ता. शिरूर) येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री येमाई देवी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ग्रहणामुळे सोहळ्याला गर्दी कमी

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे श्री येमाई देवी कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. कवठे येमाई येथील बाराभाऊ बलुतेदार मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री येमाई देवी पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीने साजरा करण्यात येतो. (Shirur New) त्याप्रमाणे यावर्षी देखील विद्युत रोषणाई व फुलांनी पालखी सजविण्यात आली होती. सायंकाळी गावातून ग्रामपंचायतीच्या चावडीवरून पालखी सोहळा निघाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या वेळी पारंपरिक वाद्याने हा मिरवणूक सोहळा सुरू झाला. या पालखी सोहळ्याला भुतेबाबाची हजेरी आकर्षक ठरली. बाराभाऊ बलुतेदार मंडळाच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. होळीच्या चौकादरम्यान हा पालखी सोहळा थांबविण्यात आला. (Shirur New) त्याठिकाणी ढोल-ताशांची जुगलबंदी पहावयास मिळाली. त्यानंतर संपूर्ण गावातून पालखी सोहळ्याची मिरवणूक संपन्न झाली. या वेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालखी सोहळा मिरवणूक पुन्हा चावडीवर आली. त्यावेळी श्री येमाई देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर हा पालखी सोहळा विसर्जित करण्यात आला.

जुनी परंपरा…
कोजागिरी पौर्णिमेला बाराभाऊ बलुतेदार मंडळाची गावातून निघणारी ही पालखी पारंपरिक व आगळीवेगळी आहे. ही जुनी परंपरा आजही टिकून आहे. रात्र जागवून सुरू राहणारा हा पालखी सोहळा चार पिढ्यांपासून होतो. या काळात पाऊस असल्यास सोहळा लवकर विसर्जित केला जातो. रात्र जागविण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच बाराभाऊ बलुतेदार मंडळाची नाटके होतात. या परंपरेला देखील फाटा देण्यात आला आहे. पूर्वी या सोहळ्यात सोंग काढणे असे कार्यक्रम होत असत.

कोजागिरी पौर्णिमेवर ग्रहणाचे सावट…
शनिवारी (ता. २८) आक्टोबर रोजी दुपारी ३.३० पासून रविवारी २९ च्या पहाटे २.२३ वाजेपर्यंत खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध लागले होते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त करायची पूजा, दुधाचा नैवेद्य ग्रहण लागण्यापुर्वी करता होणार होता. प्रसाद म्हणून एक पळी दूध प्राशन करावे. उरलेले दूध दुसऱ्या दिवशी प्यावे, असे सांगण्यात आल्याने या सोहळ्याला गर्दी कमी होती.

चंद्रग्रहण का घडते…
जेव्हा सूर्य, पृथ्वी, आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. तेव्हा ग्रहणे होतात. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृ्थ्वीची सावली चंद्रावर पडते.(Shirur New)  त्यामुळे चंद्रग्रहण होते. चंद्र ग्रहणाचे छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास असे तीन प्रकार आहेत. यावेळचे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारचे आहे. याच महिन्यात १४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण एका मागोमाग येत असतात.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : मराठा आरक्षणप्रश्नी गावोगावी झळकले नेत्यांना गावबंदीचे फलक

Shirur News : निमगाव म्हाळुंगी येथे मराठा समाजाचा एकच निर्धार ‘आधी आरक्षण, मग इलेक्शन’

Shirur News : कवठे येमाई येथे मराठा समाजाचे चक्री उपोषण; गावात पुढार्‍यांना प्रवेश बंदी…!

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भिगवण पोलीस ठाण्यावर शोककळा; पोलीस हवालदार सचिन भस्मे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Thursday, 26 November 2026, 12:24

दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर? पुण्यात 5 शिक्षक निलंबित; 46 प्रमाणपत्रेही बोगस

Thursday, 26 November 2026, 12:17

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरणात मोठी कारवाई; 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 26 November 2026, 12:09

म्हसोबाच्यावाडीत घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; भिगवण पोलिसात गुन्हा दाखल

Thursday, 26 November 2026, 11:17

इंदापूर तहसील कार्यालयात नेमकं चाललंय काय? तहसीलदार हटवण्यासाठी नेते उतरले रस्त्यावर; मोर्चाने वातावरण तापले

Thursday, 26 November 2026, 11:09

फुरसुंगीमध्ये 41 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; लोणी काळभोर येथील चालकाला अटक

Thursday, 26 November 2026, 11:04
Next Post

Pune News : दिवसा रेकी अन रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक ; १७३ गुन्ह्याची उकल तर १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp