Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर? पुण्यात 5 शिक्षक निलंबित; 46 प्रमाणपत्रेही बोगस

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 26 November 2026, 12:17

पुणे : दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी सवलती आणि बदलीचा लाभ घेतल्याच्या संशयातून पुणे जिल्हा परिषदेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीत अपंगत्वाचे प्रमाण अत्यंत कमी आढळल्याने जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या शिक्षकांच्या जुन्या प्रमाणपत्रांमध्ये 18 ते 60 टक्के अपंगत्व असल्याची नोंद होती. मात्र, नव्याने केलेल्या वैद्यकीय तपासणीत हे प्रमाण 0 ते 10 टक्क्यांपर्यंत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात संबंधित शिक्षकांनी दिव्यांग संवर्गातून बदली मिळवली होती का आणि इतर शासकीय सवलतींचा लाभ घेतला होता का, याची चौकशी सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

फेरतपासणीत तांदळी (ता. शिरूर) येथील कोमल शिरसाट यांचे अपंगत्व 52 टक्क्यांवरून 0 टक्के आढळले. मुटकवाडी येथील अरुणा तांबे यांचे प्रमाण 42 टक्क्यांवरून 1 टक्क्यावर आले. दरस्तुरवाडी येथील मधुकर डोंगरे यांचे 60 टक्क्यांवरून 10 टक्के, शिंगवे येथील सुभाष इंदोरे यांचे 18 टक्क्यांवरून 8 टक्के, तर वडकीनाला येथील वाजीदा शेख यांचे 45 टक्क्यांवरून 0 टक्के नोंदविण्यात आले.

नियमानुसार दिव्यांग संवर्गातील विशेष सवलती मिळवण्यासाठी किमान 40 टक्के अपंगत्व असणे आवश्यक आहे. त्यामुळे या शिक्षकांनी यापूर्वी कोणत्या आधारावर लाभ घेतले, याची पडताळणी केली जात आहे.

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील 409 शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रे जोडली होती. त्यानंतर गैरप्रकाराच्या तक्रारी आल्याने पहिल्या टप्प्यात 176 प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 46 प्रमाणपत्रे बोगस आढळली. यातील 41 शिक्षकांचे सेवा-सुविधांशी संबंधित लाभ काढून घेण्यात आले आहेत. आता आणखी 5 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या तपासणीला वेग आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर? पुण्यात 5 शिक्षक निलंबित; 46 प्रमाणपत्रेही बोगस

Thursday, 26 November 2026, 12:17

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरणात मोठी कारवाई; 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 26 November 2026, 12:09

म्हसोबाच्यावाडीत घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; भिगवण पोलिसात गुन्हा दाखल

Thursday, 26 November 2026, 11:17

इंदापूर तहसील कार्यालयात नेमकं चाललंय काय? तहसीलदार हटवण्यासाठी नेते उतरले रस्त्यावर; मोर्चाने वातावरण तापले

Thursday, 26 November 2026, 11:09

फुरसुंगीमध्ये 41 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; लोणी काळभोर येथील चालकाला अटक

Thursday, 26 November 2026, 11:04

भिगवण येथे जातीवाचक शिवीगाळ करत चौघांकडून दोन तरुणांना मारहाण; माफी मागायला लावून व्हिडिओ शूट केल्याचा आरोप

Thursday, 26 November 2026, 11:00
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp