Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण येथे जातीवाचक शिवीगाळ करत चौघांकडून दोन तरुणांना मारहाण; माफी मागायला लावून व्हिडिओ शूट केल्याचा आरोप

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 26 November 2026, 11:00

भिगवण, ता. 26 : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून दोन तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मदनवाडी (ता. इंदापूर) येथील व्यंकटेश लॉन्स परिसरात घडली. मारहाणीनंतर तरुणांना जबरदस्तीने माफी मागायला लावून त्याचा व्हिडिओ काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेहान वसीम शेख, रेहान पठाण, आदित्य आणि एका अनोळखी व्यक्ती (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत शुभम उत्तम पवार (वय 18, व्यवसाय शेती, रा. पोंधवडी, ता इंदापुर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पवार यांनी याबाबत तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 22) शुभम पवार हा भिगवण येथे बाजार करून पोंधवडीला घरी जात असताना विद्यानिकेतन अकॅडमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेहान शेख याच्या वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी रेहान याने शुभमला शिवीगाळ केली. शुभमने माफी मागून तेथून निघून गेल्यानंतरही संबंधिताने या वादाचा राग मनात धरल्याचा आरोप आहे.

मंगळवारी (ता. 24) दुपारी शुभम हा मित्र सुजल मंडलिक याच्यासह भिगवण येथील मोबाईल शॉपीमध्ये मित्र अथर्व पवार याला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी सुमित परकाळे याने फोन करून रेहान शेखला कॉन्फरन्स कॉलवर घेतले. जुन्या वादावरून रेहानने पुन्हा शिवीगाळ सुरू केली. वाद मिटवण्यासाठी व्यंकटेश लॉन्स येथे बोलावले; मात्र शुभम आणि सुजल यांनी तेथे जाणे टाळले.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुजलला रेहान पठाण याचा फोन आला. वाद मिटवण्यासाठी व्यंकटेश लॉन्स येथे बोलावल्याने शुभम, सुजल आणि राजेंद्र उर्फ प्रेम जाधव तेथे गेले. काही वेळाने रेहान शेख आणि रेहान पठाण हे स्प्लेंडर मोटारसायकलवरून, तर आदित्य व आणखी एक अनोळखी व्यक्ती दुसऱ्या दुचाकीवरून तेथे आले.

रेहान शेख याने शुभमला शिवीगाळ करत फायबरच्या काठीने मारहाण केली. रेहान पठाण आणि आदित्य यांनी शुभम व सुजल यांच्या गालावर चापट मारली. त्यानंतर चौघांनी दोघांना रेहान शेख याची माफी मागण्यास भाग पाडले. माफी मागत असतानाचा व्हिडिओ अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित केला. याचवेळी पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करून फायबरच्या काठीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, मारहाणीनंतर शुभम आणि सुजल यांनी तेथून पळ काढला; मात्र आरोपींनी पाठलाग करून वीरवाडी येथील कन्या शाळेजवळ त्यांना पकडून पुन्हा मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास आणखी मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर दोघांनी भिगवण पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी शुभम पवार याने रेहान वसीम शेख, रेहान पठाण, आदित्य आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

फुरसुंगीमध्ये 41 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; लोणी काळभोर येथील चालकाला अटक

Thursday, 26 November 2026, 11:04

भिगवण येथे जातीवाचक शिवीगाळ करत चौघांकडून दोन तरुणांना मारहाण; माफी मागायला लावून व्हिडिओ शूट केल्याचा आरोप

Thursday, 26 November 2026, 11:00

पेन्शन सुरू ठेवायची असेल तर 30 नोव्हेंबरपूर्वी तातडीने करा ‘हे’ काम

Thursday, 26 November 2026, 10:54

बिबट्याने थेट गळाच पकडला! जुन्नरमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; एकीचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Thursday, 26 November 2026, 10:33

जळगावच्या पाटील कुटुंबाला कालव्यात का फेकलं? धक्कादायक कारण आलं समोर

Thursday, 26 November 2026, 10:11

पुणे विमानतळावर आता 15 मिनिटांपेक्षा जास्त थांबलात तर 500 रुपये दंड! 1 डिसेंबरपासून नवा नियम लागू

Thursday, 26 November 2026, 10:02
Next Post

फुरसुंगीमध्ये 41 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; लोणी काळभोर येथील चालकाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp