Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर तहसील कार्यालयात नेमकं चाललंय काय? तहसीलदार हटवण्यासाठी नेते उतरले रस्त्यावर; मोर्चाने वातावरण तापले

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 26 November 2026, 11:09

आदित्य बोराटे 

इंदापूर: तहसील कार्यालयातील कथित अनागोंदी कारभार, प्रलंबित कामे आणि नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीवरून इंदापूरचे राजकीय वातावरण बुधवारी (ता. २५) चांगलेच तापले. तहसीलदारांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ भाजपसह विविध पक्षांच्या वतीने तहसीलदार हटावच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाने जनतेची दिशाभूल न करता नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि त्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत; अन्यथा अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरणेही अवघड करू, असा इशारा भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी दिला.

इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणातून महापुरुषांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावरून मार्गक्रमण करीत मोर्चा प्रशासकीय भवनासमोर पोहोचला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी बोलताना प्रदीप गारटकर यांनी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “इंदापूरचे तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही धुडकावतात. मात्र, कृषिमंत्र्यांच्या भरणेवाडी येथून फोन आल्यावरच कामे केली जातात. गरीब जनतेची कामे जाणीवपूर्वक अडवली जात असतील तर ते सहन केले जाणार नाही. तहसील कार्यालयासमोरच कार्यालय सुरू करून कामकाजावर लक्ष ठेवू. भ्रष्ट कारभाराला पाठिंबा देण्याऐवजी त्याची चौकशी झाली पाहिजे.”

भाजप नेते प्रवीण माने यांनीही तहसील कार्यालयातील प्रलंबित कामांचा पाढा वाचत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांच्या कारभारामुळे नागरिकांना उन्हात बसण्याची वेळ येत असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकारी हे जनतेचे सेवक असून, त्यांनी जनतेवर राज्य करण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही एका पक्षाच्या हितासाठी काम न करता सर्वसामान्य नागरिकांची कामे प्राधान्याने करावीत, असे ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, हनुमंत बनसोडे, आकाश कांबळे, नितीन शिंदे, तानाजी धोत्रे, नीलेश देवकर, विरोधी पक्षनेते अनिल पवार, राजाभाऊ माने, नितीन सरवदे, विठ्ठल ननवरे, अॅड. आशुतोष भोसले आणि संजय शिंदे यांनीही तहसीलदारांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

सोनाई प्रकल्पावरील टीकेलाही गारटकर यांचे प्रत्युत्तर

सोनाई प्रकल्पावरून होत असलेल्या टीकेलाही गारटकर यांनी प्रत्युत्तर दिले. सोनाईचा तहसीलदार हटाव मोर्चाशी काय संबंध, असा सवाल करत हा प्रकल्प शासनाला वर्षाकाठी सुमारे ६०० कोटी रुपये कररूपाने देतो. तसेच प्रकल्पाचे उपपदार्थ जगातील चाळीसहून अधिक देशांत पाठवले जातात. त्यामुळे या प्रकल्पाचा अभिमान बाळगला पाहिजे, असे ते म्हणाले.

‘मोर्चे सुरू असतानाही जनतेची कामे सुरूच’

दोन्ही बाजूंनी मोर्चे सुरू असताना तहसील कार्यालयाचे दैनंदिन कामकाज सुरूच होते, अशी भूमिका तहसीलदार जीवन बनसोडे यांनी मांडली. ते म्हणाले, “तहसील कार्यालयाच्या कामकाजाबाबत विरोधात आणि समर्थनार्थ दोन्ही मोर्चे सुरू असताना प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्ही दिवसभर सर्वसामान्य जनतेची कामे सुरूच ठेवली होती. वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहून त्यांनी निवेदने स्वीकारली आहेत. त्यानुसार वरिष्ठांकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल. यामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही. आमच्याकडून सर्वसामान्य जनतेची कामे यापुढेही सुरूच राहतील.”

दोन्ही निवेदने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार

तहसीलदारांच्या विरोधात आणि समर्थनार्थ अशा दोन्ही मोर्चांची निवेदने स्वीकारली आहेत. सदर निवेदने पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली असून, त्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंदापूर तहसील कार्यालयात नेमकं चाललंय काय? तहसीलदार हटवण्यासाठी नेते उतरले रस्त्यावर; मोर्चाने वातावरण तापले

Thursday, 26 November 2026, 11:09

फुरसुंगीमध्ये 41 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; लोणी काळभोर येथील चालकाला अटक

Thursday, 26 November 2026, 11:04

भिगवण येथे जातीवाचक शिवीगाळ करत चौघांकडून दोन तरुणांना मारहाण; माफी मागायला लावून व्हिडिओ शूट केल्याचा आरोप

Thursday, 26 November 2026, 11:00

पेन्शन सुरू ठेवायची असेल तर 30 नोव्हेंबरपूर्वी तातडीने करा ‘हे’ काम

Thursday, 26 November 2026, 10:54

बिबट्याने थेट गळाच पकडला! जुन्नरमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; एकीचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Thursday, 26 November 2026, 10:33

जळगावच्या पाटील कुटुंबाला कालव्यात का फेकलं? धक्कादायक कारण आलं समोर

Thursday, 26 November 2026, 10:11
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp