धनंजय साळवे
Shirur News : कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे अस्वच्छता वाढली असून, तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम रूग्णांच्या आरोग्यावर होत असून, डेंगू सदृश्य आजार होण्याची शक्यता बळावली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून औषध फवारणी करण्यात आली. नागरिकांनी देखील परिसराची स्वच्छता ठेवावी, असे आवाहन उपसरपंच उत्तम जाधव यांनी केले आहे.
मलेरिया, डेंग्यू नियंत्रणासाठी काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन
परिसरात स्वच्छता ठेवली तर कोणत्याही रोगराईला शिरकाव करता येणार नाही. मलेरिया, डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रणासाठी आपल्या घरात व परिसरात डास अळींची उत्पत्ती होणार नाही (Shirur News) याची नागरिकांनी काळजी घ्यावी. यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन कवठे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नामदेव पानगे यांनी केली आहे.
कवठे ग्रामपंचायत परिसरात डास निर्मूलनासाठी औषध फवारणी केली आहे. पुढील काही दिवसांत दर आठवड्याला ही फवारणी करण्यात येणार आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. यासाठी गावाला एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, (Shirur News) अशी सूचना सरपंच सुनीता पोकळे व ग्रामसेवक चेतन वाव्हळ यांनी दिली आहे. ही फवारणी ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे यांच्या देखरेखीखाली ग्रामपंचायत कर्मचारी कांतीलाल पंचरास, अजित शिंदे, अमोल पंचरास करत आहेत.
मलेरिया, डेंगू आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. डेंगूचा प्रसार होऊ नये यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घरातील पाणी भरलेली सर्व भांडी कोरडी करावी तसेच पाणी साठवलेली भांडी व्यवस्थित झाकून ठेवावी. घराभोवतालच्या टाकाऊ पदार्थांमध्ये जसे टायर, रिकाम्या बाटल्या यामध्ये पाणी असेल त्याची योग्य विल्हेवाट लावावी. (Shirur News) आपल्या घराभोवतीचा व गावाचा परिसर स्वच्छ ठेवावा. साचलेला कचरा, घाण याची त्वरित विल्हेवाट लावावी, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गावात तापाचे रुग्ण आढळल्यास आरोग्य सेवक-सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना कळवावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, स्नायू व सांधेदुखी, चक्कर, मळमळ, ग्रंथीना सूज, त्वचेवर चट्टे अशी लक्षणे आढळल्यास (Shirur News) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राकडून करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरुर तालुक्यातील जांबूत येथील श्रीराम गोरडे यांची कर सहाय्यक पदी निवड..
Shirur News : महिलेला हेक्साब्लेडचा धाक दाखवून दागिने लांबवले ; शिरूर तालुक्यातील घटना..