युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : शिरूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गुजर मळा परिसरात मंगळवारी (ता. ३) भटक्या कुत्र्यांनी चार वर्षीय बालकावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नगरपरिषद या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी व नागरिक करत आहेत, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी सांगितले.
नगरपरिषद या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
शिरूर शहरात भटक्या कुंत्र्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. मात्र, नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Shirur News) नुकतेच आयुष भास्कर हरिहर याला भटक्या कुत्र्याने छातीला, डोक्याला व हात-पायाला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेवरून शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रविराज लेंडे, मनसे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष डॅा. वैशाली वाखारे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद, (Shirur News) ‘आप’चे शहराध्यक्ष अनिल डांगे, हुडको कॅालनी रहिवाशी संघटक शैलेश जाधव, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष युवराज सोनार आदींनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांची भेट घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषद प्रशासन या घटेकडे दुर्लक्ष करत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी तत्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. (Shirur News) शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे म्हणाल्या की, भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर आहे. या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी तीन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. पण या कामासाठी कोणीही तयार नाही. त्यासाठी चौथ्या वेळा निविदा काढण्यात आली आहे. ती मंजूर झाली आहे. येत्या १० ते १५ दिवसांत निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मुखई तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी तुषार शुक्रे तर उपाध्यक्ष पदी सुहास मोरे..
Shirur News : रस्त्यात खड्डे अन् खड्ड्यात पाणी; पिंपरखेड-देवगाव रस्त्याची दूरवस्था