ओमकार भोरडे
शिरूर: शिरूरमधे 18 एप्रिल 2025 रोजी शिरूर शहरातील भाजीबाजार परिसरात एका महिलेसह तिच्या पती व सासूला लाथाबुक्यांनी व काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला प्रियंका निखील तिवारी (वय- 28 वर्षे, व्यवसाय घरकाम) यांनी ही फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दिली आहे. जगदीश मिश्रा, ऋतुगंध मिश्रा आणि अशुतोष मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही पुण्यातील सिंहगड रोड, वडगाव बु. येथील निलेश अपार्टमेंटमध्ये राहतात. अशी माहिती प्राप्त होत आहे.
17 एप्रिल 2025 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता ही घटना घडली. भाजीबाजार, शिरूर येथील प्रियंका यांच्या वडीलोपर्जित घराजवळ प्रियंका आपल्या सासऱ्यांसाठी रूम मागत होत्या. त्यावेळी वरील आरोपी हे पाहुणे म्हणून तेथे उपस्थित होते.
वाद वाढल्यानंतर आरोपींनी प्रियंका, तिची सासू जयश्री तिवारी आणि पती निखील तिवारी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अशुतोष मिश्रा याने लाकडी काठीनेही हल्ला केला आणि गंभीर इजा केली. तसेच, “जर पोलिसांत तक्रार केली, तर आम्ही आमचा हिसका दाखवू” अशी धमकी दिली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 256/2025 असा आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 118(1), 351(2), 351 (3), 352, 3 (5) अंतर्गत हा गुन्हा तिघांवर दाखल करण्यात आला आहे. दाखल अमंलदार पोलिस हवालदार बनकर हे आहेत.
प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस हवालदार खेडकर हे करत आहेत.