Pune News : पुणे : पुण्यातून वरांधा घाट मार्गे कोकणात फिरायला जाताना एक चारचाकी गाडी नीरा देवधर धरणात कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २९) सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर एक जण बचावला आहे.
एक जण बचावला
अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिंदे आणि हरप्रीत या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर संकेत जोशी (वय २६, रा. बाणेर) असे या अपघातातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर तालुक्यातील निरादेवघर धरण मार्गाने महाडकडे जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. (Pune News) धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर गाडी २०० फूट उंचीवरून नीरा देवधर धरणाच्या पाण्यात पडली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने पोलिसांनी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. (Pune News) तर एकजण थोडक्यात बचावला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लहान असतानाच वडिलांचं छत्र हरपलं; अंगणवाडी सेविकेच्या दोन्ही लेकींनी पांग फेडलं