Pune News : पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तर काही तरूणांनी मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आता व्यापारी बांधव देखील सरसावले आहेत. बुधवारी (ता. १) मार्केट यार्ड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी सरसावले
शेतकऱ्यांनी बुधवारी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune News) फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले आणि सचिव करण जाधव यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत फळे व भाजीपाला विभागातील व्यापाऱ्यांसह विविध घटक गेट क्रमांक १ येथील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण करणार आहेत. (Pune News) फुलबाजारातील दोन्ही संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहे. यामुळे आंदोलनादरम्यान फुलबाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अखिल पुणे फुल बाजाराचे अध्यक्ष अरुण वीर, फुलबाजार आडते व व्यापारी संघाचे अध्यक्ष अप्पा गायकवाड यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी लाक्षणिक बंदचे आवाहन केले आहे. व्यापारी यामध्ये सहभागी होणार आहेत.
– अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट; जळगावातील चोरट्यांना पुण्यात सापळा रचून अटक
Pune News : सासूने नकटी संबोधले; सुनेने सासूच्या हातावर सुरीने सपासप वार केले
Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..