Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

S Jaishankar : कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची एस. जयशंकर यांनी घेतली भेट, म्हणाले…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 30 October 2023, 16:31

S Jaishankar : नवी दिल्ली : कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेल्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भेट घेतली. कतारच्या न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. भारताकडून या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज या ८ निवृत्त अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. याप्रकरणी सरकार गांभीर्याने प्रयत्न करत असल्याचं आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिलं. याबाबत X वर त्यांनी माहिती दिली आहे.

सरकार गांभीर्याने प्रयत्न करत असल्याचं आश्वासन

माजी नौदल अधिकाऱ्यांची नावे : कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. या वर्षी २९ मार्च रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते. रॉयल ओमान एअर फोर्समधून निवृत्त झालेले वैमानिक व ओमानी नागरिक खमिस अल अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या आठ भारतीयांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

सुरक्षेशी संबंधित अंदाज : हे प्रकरण सुरक्षेशी संबंधित असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. या आठ भारतीय माजी नौसेना अधिकाऱ्यांवर काय आरोप ठेवण्यात आले, याची माहिती अद्याप सार्वजनिक केली गेलेली नाही. तरी त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकांतवासात बंदिस्त करण्यात आले आहे.

 

कतारने भारतीय अधिकाऱ्यांना कधी अटक केली? : आठही जणांना कतारी गुप्तचर यंत्रणा स्टेट सिक्युरिटी ब्युरोने अटक केली होती. ज्याची माहिती सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला देण्यात आली. ३० सप्टेंबरला प्रथमच त्यांना कुटुंबातील सदस्यांशी दूरध्वनीद्वारे बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर जवळपास महिनाभराने ३ ऑक्टोबरला भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना आठही भारतीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. पुढचे काही महिने या नौसैनिकांना आठवड्यातून एकदा कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलण्याची परवानगी देण्यात आली होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post
Maratha Reservation BJP MLA Prashant Bamb office vandalized by protestors in chhatrapati sambhajinagar

Maratha Reservation: तोडफोडीचे लोण आता छत्रपती संभाजीनगरात; भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.