Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 November 2026, 14:22

आदित्य बोराटे 

उजनी: उजनी जलाशय परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटरसह अन्य प्रकल्पांना विरोध तीव्र होत असून, या विरोधाची धग आता आंदोलनाच्या माध्यमातून अधिक तीव्र झाली आहे. या प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी भीमानगर येथे शेतकरी आणि मच्छीमार व्यावसायिकांनी हातात मशाली घेऊन भव्य मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या आंदोलकांनी प्रकल्पांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले.

भीमानगर चौकातून सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेला हा मशाल मोर्चा उजनी जलसंपदा कार्यालयापर्यंत काढण्यात आला. इंदापूर, टेंभुर्णी, भीमानगर, भिगवण, करमाळा यांसह उजनी जलाशय परिसरातील विविध भागांतील शेतकरी आणि मच्छीमार व्यावसायिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. हातात पेटत्या मशाली घेऊन एकत्र आलेल्या आंदोलकांनी प्रस्तावित प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शविला.

उजनी जलाशय परिसरातील प्रस्तावित चार प्रकल्पांच्या विरोधात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून विविध माध्यमांतून आंदोलने सुरू आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाही शासनाकडून अद्याप ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसल्याची भावना आंदोलकांमधून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याच्या उद्देशाने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

*प्रकल्पसमर्थक नेत्यांचा जाहीर निषेध*

प्रस्तावित प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या नेत्यांचाही यावेळी आंदोलकांनी जाहीर निषेध केला. यापूर्वी उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सोलापूर-इंदापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, ठेचा-भाकरी आंदोलन तसेच प्रकल्पसमर्थक नेत्याच्या निषेधार्थ दशक्रिया विधीचा कार्यक्रम अशा विविध आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब केला आहे.

एकीकडे उजनी परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असताना, दुसरीकडे शासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पांचा प्रश्न मार्गी लागणार की आंदोलनाची धग आणखी वाढणार, याकडे आता उजनी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील,खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,आमदार नारायण आबा पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर,महारुद्र पाटील,अमोल भिसे,संजय सोनवणे, प्रा.कृष्णाजी ताटे, मयूर पाटील,संदीपान कडवळे, अनिताताई खरात,पूजा घोलप तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अन्यायाविरुद्ध संघर्ष हेच आमचे ब्रीदवाक्य!” – प्रदीप गारटकर

“उजनी परिसरातील शेतकरी, मच्छीमार व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांच्या हिताला बाधा पोहोचवणारा कोणताही प्रकल्प आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला, तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. हा प्रकल्प आपल्यावर लादलाच, तर सरकार कोणाचे आहे आणि सध्या सरकारमध्ये कोण आहे, याचा आम्ही विचार करणार नाही. आमचा कोणाशीही वैयक्तिक स्वार्थ किंवा देणं-घेणं नाही. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि संघर्ष करणे, हेच आमचे ब्रीदवाक्य आहे. जनतेच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढा देणार,” असा ठाम इशारा प्रदीप गारटकर यांनी दिला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22

इंडिया आघाडीच्या बैठकीत सुप्रिया सुळे गैरहजर! मतदारसंघ पुनर्रचनेवर राष्ट्रवादीचा निर्णय गुलदस्त्यात

Saturday, 28 November 2026, 14:12

शिरूरमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह तरुण अटकेत; पोलिसांची कारवाई

Saturday, 28 November 2026, 14:07

दगडूशेठ गणपती दर्शनाचे आमिष दाखवून महिलेला गंडा; 1.37 लाखांचा मुद्देमाल घेऊन तरुण पसार

Saturday, 28 November 2026, 12:46

Gold Rate Today: सोन्याच्या दरवाढीला ब्रेक; 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर जाहीर

Saturday, 28 November 2026, 12:22

कवडीपाट टोलनाक्यावर कोयता घेऊन फिरणाऱ्या ‘डच्या लोंढे’ला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Saturday, 28 November 2026, 11:27
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp