मुंबई : सोन्याचे दर पुन्हा एकदा कमी झाल्याने दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली दरवाढ आता थांबली असून, आठवड्याच्या शेवटी सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, काही दिवसांतच सोन्याचे दर प्रतितोळा 3 ते 4 हजार रुपयांनी वाढले होते.

आजच्या बाजारातील दरांनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्यामागे 540 रुपयांची घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे दरही 500 रुपयांनी कमी झाले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या किमतीतदेखील घसरण झाली आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 12 हजार रुपयांहून अधिक घट झाली होती. त्यानंतर सोमवारपासून बाजारात पुन्हा तेजी दिसू लागली. सलग काही दिवस भाव वाढत असल्याने ग्राहक खरेदीसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. आता दरात झालेल्या घसरणीमुळे लग्नसराईच्या खरेदीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

प्रति तोळा सोन्याचे दर किती?
माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 28 हजार 10 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 17 हजार 350 रुपये, तर 18 कॅरेट सोन्यासाठी 96 हजार 40 रुपये मोजावे लागत आहेत. प्रति ग्रॅम दरांमध्ये 24 कॅरेट सोने 12,801 रुपये, 22 कॅरेट सोने 11,735 रुपये आणि 18 कॅरेट सोने 9,604 रुपये आहे.
मुंबई-पुण्यातील दर
मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये उपलब्ध माहितीनुसार सोन्याचे दर समान आहेत.
- 24 कॅरेट : 12,786 रुपये प्रति ग्रॅम
- 22 कॅरेट : 11,720 रुपये प्रति ग्रॅम
- 18 कॅरेट : 9,589 रुपये प्रति ग्रॅम
दागिने खरेदी करताना या दरांव्यतिरिक्त जीएसटी आणि घडणावळ शुल्कही द्यावे लागते. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानातील अंतिम किंमत वेगळी असू शकते. खरेदीपूर्वी स्थानिक सराफांकडून ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे.






