Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर फाट्याजवळ भरधाव दुचाकीने धडक दिल्याने सुरक्षारक्षकाचा जागीच मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 November 2026, 10:52
Accident

Accident

लोणी काळभोर, ता. 28 : कामावरून घरी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या 67 वर्षीय सुरक्षा रक्षकाला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी येथे थेऊर फाट्याजवळील कुंजीरकार सर्व्हिस सेंटरसमोर घडली.

कुंडलिक गोरख मुंढे (वय 67) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.तर प्रथमेश सुशीलकुमार मोहन (वय 21, रा. कोंढवा खुर्द, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे मुलगा ऋषीकेश कुंडलिक मुंढे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलिक मुंढे हे थेऊर फाट्याजवळील तरवडे कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी ते सोलापूर-पुणे महामार्गाच्या कडेला रिक्षाची वाट पाहत थांबले होते.

यावेळी प्रथमेश सुशीलकुमार मोहन (वय 21, रा. कोंढवा खुर्द, पुणे) हा टीव्हीएस दुचाकी (MH 12 YV 9954) भरधाव वेगाने चालवत आला. त्याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून मुंढे यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत मुंढे यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले, तसेच उजव्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर जखमी मुंढे यांना तातडीने विश्वराज हॉस्पिटल, लोणी स्टेशन येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर ससून रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मूळ गावी वडगाव जहागीर, ता. कळंब, जि. धाराशिव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी मृताचे मुलगा ऋषीकेश मुंढे यांनी 27 नोव्हेंबर रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुचाकी चालकाने हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालवून वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रथमेश मोहन याच्यावर मोटरवाहन अधिनियम, 1988 – 119,177,184 ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 106(1),281 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Accident

थेऊर फाट्याजवळ भरधाव दुचाकीने धडक दिल्याने सुरक्षारक्षकाचा जागीच मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

Saturday, 28 November 2026, 10:52

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शिरूर तालुक्यात एकाची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपींची नावे गुलदस्त्यात

Saturday, 28 November 2026, 10:47

तुमच्याही वाहनावर ई-चलान पेंडिंग आहे? सरकारचा मोठा निर्णय; दंडाच्या रकमेत होणार कपात

Saturday, 28 November 2026, 10:41

वर्षानुवर्षे सरकारी जमिनीवर राहणाऱ्यांसाठी खुशखबर! घरांचा मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा?

Saturday, 28 November 2026, 10:06

नोव्हेंबर संपत आला तरी थंडीचा पत्ता नाही! राज्यात कुठे वाढणार थंडी, कुठे जाणवणार उन्हाचा चटका? वाचा

Saturday, 28 November 2026, 9:54

Daily Horoscope: आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी ठरणार लकी! 12 पैकी ‘या’ राशींचे नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार सुख-समृद्धी

Saturday, 28 November 2026, 9:31
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp