Pune News : पुणे : ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी पाटील याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या युनिट एककडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाचजणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार ललित पाटील पसार झाला आहे.
दहा पथके तयार
ससून रुग्णालयातून पसार झालेल्या पाटील याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. पाटील याला दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल याला गेल्या शनिवारी (ता. ३०) रुग्णालयाच्या परिसरात गुन्हे शाखेने पकडले. ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहात काम करणारा रौफ शेख याच्यामार्फत मंडल पाटीलला अमली पदार्थ देणार होता. पाटील रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. हा गुन्हा घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाटील रुग्णालयात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. पोलिसांना चकवा देत पाटील फरार झाल्याची गंभीर दखल घेऊन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आत्तापर्यंत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. (Pune News) त्यात दोन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील, त्याचा भाऊ भूषण, साथीदार अभिषेक पसार झाल्यानंतर त्यांचा विशेष पथकाकडून शोध घेण्यात येत होता. भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक यांना नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली.
ललित पाटील याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे .यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी पाटील याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या युनिट एककडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. (Pune News) या प्रकरणात आतापर्यंत पाचजणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार ललित पाटील पसार झाला आहे. पाटील याला मोटारीतून पिंपरी-चिंचवड शहरातील रावेतपर्यंत सोडणारा मोटारचालक दत्ता डोके याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या पथकाने पाटीलचा साथीदार अभिषेक याच्या नाशिकमधील घरावर छापा टाकून तीन किलो सोने जप्त केले आहे. अमली पदार्थ विक्रीतून पाटील, त्याचा भाऊ भूषण, अभिषेक यांनी सोने, तसेच जमीन खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. (Pune News) मुंबई पोलिसांनी पाटील याच्या नाशिकमधील शिंदे गावातील कारखान्यात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने तपास गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे रेल्वे स्थानकावरुन तब्बल ९० किलो गांजा जप्त ; दोन तस्करांना अटक
Pune News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आता वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यातून सुटणार…
Pune News : पुण्यातील बाबा भिडे पूल तब्बल दोन महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद; काय आहे कारण…