पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीसह अपघातांच्या घटनांचे प्रमाण देखील वाढत चाललं आहे.अशातच पुणे शहरातल्या कोथरूड परिसरात भरधाव वेगात असलेल्या एका कारने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकीं उडवल्या आहेत.हा अपघात अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव वेगात असलेल्या कारने पाच ते सहा दुचाकी उडवल्या आहेत.कार चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले व त्याने उभ्या असलेल्या दुचाकींना उडवले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कुणीही जखमी झालेले नाही.दरम्यान, या अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात भरधाव कार दुचाकींना धडक देताना दिसत आहे.
दरम्यान अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या मद्यधुंद कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.