Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! पुण्यात RTO ॲक्शन मोडमध्ये; हेल्मेट न वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय…  

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 November 2025, 19:23
Pune RTO

Pune RTO

पुणे: शहरात दुचाकी अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Pune RTO) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा आरटीओ विभागाने दिला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक सरकारी कर्मचारी आणि अधिकारी हेल्मेट न घालता दुचाकीवरून कार्यालयात ये-जा करताना आढळले आहेत. नागरिकांना नियम पाळायला सांगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हा निष्काळजीपणा रोखण्यासाठी विभाग आता अधिक कठोर भूमिका घेत आहे. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने हेल्मेट न घातल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई तर होईलच, पण त्याचबरोबर शिस्तभंगात्मक कारवाईलाही त्यांना सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा: Loni Kalbhor: लोणी काळभोर पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन; जखमी आजीवर उपचार करून तिच्या नातेवाईकांकडे सुखरूप केले सुपूर्त

पीएमपीएमएल आणि एसटी चालकांसाठी विशेष मार्गदर्शन

रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) आणि एसटी महामंडळाच्या बसचालकांसाठीही विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये सुरक्षित वाहन चालवण्याच्या पद्धती, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यावर तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी..! राज्य शिक्षण विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची होणार चौकशी

वाहतूक कोंडीला रामराम! ‘डबल डेक्कर’ फ्लायओव्हरची योजना

पुण्याच्या पूर्व भागात वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता पुणे मेट्रोचा विस्तार करणे आता काळाची गरज बनले आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. महा मेट्रो लवकरच रामवाडी ते वाघोली या 11.63 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे. या मार्गावर महा मेट्रो एक अभिनव ‘डबल डेक्कर’ फ्लायओव्हर उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या फ्लायओव्हरमध्ये वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका असेल, तर खालच्या स्तरावर वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे जागेचा कार्यक्षम वापर होणार असून, पुणेकरांना प्रवास सुरक्षित आणि सुखर होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ महत्त्वाच्या चौकातील रस्त्यांवर खोदकाम सुरू; प्रवासाला निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग तपासा, अन्यथा ट्रॅफिकमध्ये अडकाल!

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59
Next Post
Uttar Pradesh Crime: Heartbreaking incident..! Taking a friend's 5-year-old daughter outside to play....and raped; What happened?

हृदय पिळवटणारी घटना..! बाहेर खेळायला घेऊन.., मित्राच्याच 5 वर्षीय मुलीवर केला बलात्कार; परिसरात संतापाची लाट    

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp