Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 November 2026, 16:15

पुणे : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुणे विभागस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा उद्या, सोमवार (ता. ३० नोव्हेंबर) रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता बालेवाडी येथील क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्यात पुणे विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत (२०२६-२७) विभागस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा विकास’ या विषयावर विशेष परिसंवादही होणार आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुणे विभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सातारा जिल्ह्यातील कावडी (ता. जावळी) ग्रामपंचायतीला द्वितीय, तर पुणे जिल्ह्यातील काळवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुरंदर तालुक्यातील गुरोळीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. आंबेगाव तालुक्यातील रांजणीला द्वितीय, तर निधोटवाडीला तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील सरपंच, ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यापुरते मर्यादित नसून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांना एकत्र आणण्यावर भर दिला जात आहे.

पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचे अनुभव इतर गावांपर्यंत पोहोचवणे आणि दुसऱ्या टप्प्यात अधिक व्यापक लोकसहभाग निर्माण करणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय सुशासन, जलसंधारण, शाश्वत विकास, पायाभूत सुविधा आणि लोकसहभाग या क्षेत्रांतील उल्लेखनीय कामांचा आढावा घेतला जाणार आहे.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर राबवता येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या कामाचा गौरव करण्याबरोबरच आगामी टप्प्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नियोजन, समन्वय, नियमित संनियंत्रण आणि गुणवत्तापूर्ण कामकाजाला चालना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp