Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी काळभोर पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन; जखमी आजीवर उपचार करून तिच्या नातेवाईकांकडे सुखरूप केले सुपूर्त

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 November 2025, 18:10

लोणी काळभोर, ता. 23: श्री क्षेत्र रामदरा शिवालायाचे (Loni Kalbhor) दर्शन करण्यासाठी आलेली आजी चिमुकल्याला वाचविताना जखमी झाल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या आजीला लोणी काळभोर पोलिसांनी योग्य औषधोपचार करून सुखरूप त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आज माणुसकीचे दर्शन घडवून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शकुंतला गणेश कानफळ (वय अंदाजे 80, मूळ, रा. कर्नाटक, सध्या रा. फुरसुंगी, ता. हवेली) असे जखमी झालेल्या आजीचे नाव आहे. शकुंतला कानफळ या लोणी काळभोर येथील श्री क्षेत्र रामदरा शिवालायाचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी (ता.22) आल्या होत्या. मंदिराचे प्रवेश द्वार सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात येते. हे त्यांना माहिती नव्हते. म्हणून आजी बाहेरूनच दर्शन घेऊन माघारी निघाल्या होत्या.

रस्त्याने चालत जात असताना, आजीच्या समोर एक चिमुकला देखील पायी चालला होता. चिमुकला पायात पाय अडकून पडणार तेवढ्यात आजीची ममता जागी झाली आणि त्यांनी प्रसंगावधान दाखवीत मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचा तो प्रयत्न यशस्वीदेखील झाला. परंतु, त्यांचाच तोल गेला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. या घटनेत आजी गंभीर जखमी झाल्या . त्यांच्या नाकातून मोठा रक्तस्त्राव वाहत होता. तसेच त्यांचे हात पाय थरथर कापत होते. नागरिकांनी आजीला उचलले व या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार करून आजीला मदत करण्यासाठी पाठविले. पथकाने वेळ न दडवता तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आजीला तत्काळ लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मेहबूब लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजीवर औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी आजीला जेवण उपलब्ध करून दिले. जेवण केल्यानंतर आजीने गोळ्या खाल्या. पोलिसांना आजीला बरे वाटल्याची खात्री पटल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी आजीला तिच्या नातेवाईकांकडे पाठविण्यासाठी एक गाडी तयार केली.

लोणी काळभोर पोलिसांनी शकुंतला आजीला तीचे फुरसुंगी येथील नातेवाईक राधा साहेबराव शिनगारे यांच्याकडे सुखरूप सुपूर्त केले. आजीला तिच्या नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचविण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, रत्नदीप जाधव, पोलीस हवालदार विजय जाधव, केतन धेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुमुल्य मदत मिळाली. लोणी काळभोर पोलिसांनी आजीला मदत करून आज माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31
Next Post
BIG BREAKING: Finally, the police have registered a case in the Gauri Garje suicide case; a case has been registered against 'these' people

Gauri Garje Suicide: अखेर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल; 'या' लोकांवर गुन्हा 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp