Gauri Garje Suicide : पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे (Pankaja Munde PA Anant Garje) यांच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिवसभराच्या आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर पोलिसांकडून गौरीचा पती, नणंद आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fir against anant garje)

अनंत गर्जे यांचे किरण नावाच्या दुसऱ्या एका मुलीशी संबंध होते. हे काळातच डॉ. गौरी आणि अनंत यांच्यात वाद होऊ लागले होते. त्यानंतर काल गौरी यांनी संध्याळच्या सुमारास आत्महत्या केली. आता पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत गारी यांचा पती, नणंद आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. गौरी गर्जे यांना छळ आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी गर्जे कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. गौरी यांचे पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे या तिघांवर पोलिसांकडून आज (23 नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज वरळी पोलीस ठाण्यात डॉ. गौरी यांचे पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे या तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352,351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







