पिंपरी : पिंपरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुड डिलिव्हरी बॉयने ऑनलाइन जुगार पाच एकर शेतजमीन विकून सर्व पैसे हारल्यानंतर बहिणीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जमिनीचे पैसे ऑनलाइन जुगार गमावल्यानंतर पुण्यात येऊन घरपोच अन्न पुरविण्याचे काम करू लागला होता. परंतु पैसे कमी पडल्यामुळे तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी आपल्या बहिणीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की. आरोपी श्रीकांत दशरत पांगरे (वयवर्षे २९, रा. कुंभेजळगाव, गेवराई, बीड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी भागातील वाल्हेकरवाडी येथील एका हौसिंग सोसायटीत १३ जानेवारी रोजी दुपारी घरफोडी झाल्याचे समोर आले होते. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
सख्ख्या भावानेच केली बहिणीच्या घरी चोरी
पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले कि चोरी बाहेरील कोणी व्यक्तीने केली नसावी. या प्रकरणात घरातीलच कोणीतरी असल्याचा पोलिसांचा संशय होता. चोरी झालेल्या कुटुंबीयांची चौकशी केली असता फिर्यादीचा सख्खा भाऊ श्रीकांत हा मागच्या चार महिन्यांपासून त्यांच्याकडे राहण्यास आला होता. असे पोलिसांना सांगण्यात आले. श्रीकांत डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो.
पोलिसांनी श्रीकांतबाबत अधिक माहिती घेऊन तपास सुरु केला. श्रीकांतला ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय आहे असे पोलीस तपासात उघड झाले. अधिक तपास केला असता त्याने गावाकडील पाच एकर शेतजमीन विकून जुगारात पैसे हारल्याचे उघड झाल्यामुळे श्रीकांतवर पोलिसांचा अधिक संशय बळावला.
पोलिसांनी अधिक दमदाटी करून तपास केला असता ऑनलाइन जुगार खेळून लोकांचे उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी बहीणीच्या घरामध्ये चोरी केल्याचे काबुल केले आहे. पोलिसांनी आरोपी श्रीकांतला अटक केली आहे.