Pimpri News : पिंपरी : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सामने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू आहेत. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हा सामना हाऊसफुल्ल आहे. मात्र, मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरात ठिकठिकाणी हिंसक वळण मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सामन्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी एक पोलीस उपायुक्त, मैदान परिसरातील सुरक्षिततेसाठी एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, ७० सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ८०० अंमलदार, एसआरपीच्या तीन टीम असणार आहेत. परिणामी सामन्याच्या पूर्वसंध्येला परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला परिसराला छावणीचे स्वरूप
पोलिसांनी मैदानाच्या जवळचा परिसर ताब्यात घेतला आहे. सामना दुपारी दोन वाजता होणार असून, मैदानाचे दरवाजे प्रेक्षकांसाठी दुपारी १२.३० वाजता उघडले जाणार आहेत. सामना दोन तगड्या संघात असल्यामुळे सामन्याची सर्व तिकिटे संपली आहेत. अशा वेळी मोठी गर्दी होणार यात शंका नाही.(Pimpri News ) त्यामुळे तिकीटधारकांनी लवकरात लवकर वेळेत मैदानावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दुपारपर्यंत या आंदोलनाची झळ ठिकठिकाणी पोचत असल्यामुळे संध्याकाळनंतर पोलिसांनी संपूर्ण मैदान ताब्यात घेतले असून, सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस परिस्थिती हाताळत असल्याचे सांगितले.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्री; १४ लाखांचा ऐवज जप्त
Pimpri News : चिंचवड येथे ४ ऑक्टोबरला ‘श्यामची आई’ कृतज्ञता सोहळा
Pimpri News : पिंपरीच्या रहाटणी येथील राम मंदिरात महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा स्थापन