पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी गोडाऊन चौक परिसरात एका वेगाने येणाऱ्या जेसीबीने ६ वर्षांच्या मुलाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ऋषिकेश जयदेव खराडे असे या अपघातातील मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी 11 च्या सुमारास तो जवळच्या भाजी विक्रेत्याकडून कोथिंबीर खरेदी करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर ऋषिकेशला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
ऋषिकेशच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी चालक राहुल श्रीरामचंद्र जाधव (२६) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106 (1 ) , 281, मोटार वाहन कायदा कलम 184, 119/ 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.