-संगीता कांबळे
पिंपरी : पिंपरी चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी नेहरूनगर न्यायालयात 267 खटले निकाली काढण्यात आले. त्यामुळे 2,03,34,825 रुपये किमतीचे दावे निकाली निघाले तर आकुर्डी न्यायालयात येथे 324 खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये 97,62,821रुपये महसूल जमा झाला व वाहतूक चलनाच्या प्रकरणात 1,03,800 दंड जमा झाला.
यामध्ये पिंपरी नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.चव्हाण, एल ए.के.एमुदी, बी.डी.चौखट व आकुर्डी न्यायालयात वी.एस.डामरे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून तसेच यावेळी पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर तर प्रमुख उपस्थिती ॲड.संगीता परब यांची होती.
या वेळी पिं.चि.ॲड.बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.सतीश गोरडे, ॲड.सुहास पडवळ, ॲड.राजेश पुणेकर यांनी मार्गदर्शन केले. एल. ए. के.एमुदी यांनी लोकन्यायालयात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे अवाहन केले. ॲड. पडवळ, ॲड.गोरडे यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व त्याची स्थापना व भविष्यात त्याचे महत्त्व पटवून सांगितले. तर ॲड.मंचरकर यांनी लोकन्यायालयाची संकल्पना त्याचा इतिहास व सांमजस्याने कसे वाद मिटवता येतील याचे मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमात दि पुणे लॅायर्स कंझ्युमर्स को. ऑप.सोसायटी ली. नवनिर्वाचित तज्ञ संचालक पदी ॲड.राजेश पुणेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पिंपरी चिंचवड ॲड बार असोसिएशन द्वारे सत्कार करण्यात आला. त्यावेळी पिं.चि.ॲड.बार असोसिएशनचे माजी.अध्यक्ष ॲड.सुदाम साने, ॲड.मदनलाल छाजेड, माजी उपाध्यक्ष ॲड.अतुल अडसरे, ॲड.गौरव वांळुज जेष्ठ विधीज्ञ ॲड.सुजाता बीडकर, ॲड.मोनिका गाढवे व पिंपरी चिंचवड युनिर्व्हसिटीचे विद्यार्थी, एस.एन.बी.पी कॅालेज चे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲड. अनिकेत खिलनानी, ॲड.शंकर घंगाळे, ॲड.संघर्ष सुर्यवंशी व ॲड.मानसी उदासी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे नियोजन पिं.चि.ॲड.बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड.धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड.मोनिका सचवाणी, ॲाडिटर ॲड.संदीप तापकिर, सदस्य ॲड.फारूख शेख, ॲड.दशरथ बावकर, ॲड.अस्मिता पिंगळे, ॲड.मिनल दर्शले यांनी केले. तर सूत्रसंचालन ॲड.धनंजय कोकणे व आभार ॲड.फारूख शेख यांनी मानले.