पुणे: जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. दौंड तालुक्यातील नामांकित शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्य मुलाने दुसर्या वर्गातील मुलाला तिच्यावर बलात्कार आणि खून करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्या शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली आहे. इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्य मुलाने दुसर्या वर्गातील मुलाला तिच्यावर बलात्कार आणि खून करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. दौंड येथील एका शाळेतील एका विद्यार्थ्याने प्रगतीपुस्तकावर पालकाची खोटी सही करताना त्याच्याच वर्गातील मुलीने पहिले. त्यानंतर हा प्रकार तिने शिक्षकांना सांगितला. शिक्षकांकडे पीडित मुलीने तक्रार केल्याचा राग मुलाच्या मनात होता. म्हणून त्याने त्याची शिक्षकांकडे तक्रार करणार्या मुलीवर बलात्कार कर आणि त्यानंतर तिचा खून कर यासाठी मी तुला १०० रुपये देतो असे दुसर्या वर्गातील मुलाला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या वर्गातील मुलाने हा प्रकार प्रत्यक्ष मुलीला सांगितला.
मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवरदेखील गुन्हा दाखल
यानंतर हा सर्व प्रकार पीडित मुलीने शाळेतून घरी गेल्यावर घरच्यांना सांगितला. पीडित मुलीचे कौटुंब शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडे संबधित मुलाची तक्रार करण्यासाठी गेले असता पीडित मुलीवरच त्यांनी आरोप केले. आणि हे प्रकरण बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित मुलीचे आई वडील पोलिसांकडे गेले आणि तक्रार दिली. संबंधित मुलाला लवकरच बाल न्याय मंडळासमोर उपस्थित केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यानंतर संबधित शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवरदेखील गुन्हा दाखल केला असून त्यांची या प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे.









