Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अचानक आपल्या आधीच्या सासूला पाहताच वधूने ठोकली धूम! श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

संदीप टूलेby संदीप टूले
Tuesday, 28 January 2025, 18:49

श्रीगोंदा: सध्या लगीन सराई हंगाम जोमात सुरू असून श्रीगोंदा तालुक्यात एका लग्नात आगळा वेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील मुलगा पुणे येथील खासगी कंपनीत कामास आहे. मुलाचे लग्न करायचे असल्याने घरची मंडळी मुलगी पाहत होते. त्याच दरम्यान लग्न जमविणार्‍या मध्यस्थीची भेट झाली. त्या मध्यस्थीने विवाह जमवून देतो; पण लग्नासाठी दोन लाख 60 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. विवाह निश्चित झाल्यानंतर 40 हजार व लग्न झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. वधू-वराचे लग्न आळंदी येथे पार पडले. रितीरिवाजाप्रमाणे सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास आजूबाजूच्या नातेवाइकांना निमंत्रण देण्यात आले होते.

या कार्यक्रमास एक महिला नातेवाईकही आली होती. पूजेच्या दरम्यान त्या महिलेने वधूला पाहताच तिला धक्काच बसला. तिने ही माहिती नातेवाइकांना सांगितली. ज्या वधूशी लग्न झाले आहे त्याच वधूचे मागील वर्षी माझ्या मुलाशी लग्न झाले होते. आमच्याकडून दोन लाख रुपये घेऊन या वधूने पलायन केले होते. हे संभाषण त्या बनावट वधूने ऐकले. लागलीच मध्यस्थी अन् त्या बनावट वधूने तेथून धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वराकडील मंडळीने लग्न जमविणार्‍या मध्यस्थीकडे दिलेले पैसे परत मिळावे यासाठी मागणी केली. मात्र, त्या मध्यस्थीने पैसे देण्यास नकार दिला. लग्नही गेले अन् पैसेही अशी अवस्था त्या वरासह नातेवाइकांची झाली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

समाजात बदनामी नको म्हणून पोलिसात तक्रार नाही

सध्या अनेक मुलांचे काही कारणास्तव लग्न रखडलेले पाहायला मिळत असून अश्याच मुलांच्या नातेवाईकांना ह्या टोळ्यातील सदस्य हेरतात व तुमच्या मुलाला वधू पाहून देतो म्हणून आर्थिक देवाण घेवाण करून तात्पुरत्या स्वरूपात लग्न ही लाऊन देतात व लग्नानंतर दाग दागिने घेऊन वधू पसार होते. यानंतर परत मुलाच्या नातेवाईकांनाच पोलिस केस करून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. समाजात बदनामी नको म्हणून कित्येक कुटुंबे आज या प्रकाराला बळी पडूनही गप्प आहेत.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post

जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp