Maval News : पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. आजपासून (ता. १५) मंदिर परिसरात नवरात्रोत्सव यात्रा सुरु होत आहे. येथील गर्दी लक्षात घेता, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यात्रा कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जड, अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश
कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण वेळ जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. तर २१ ते २३ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा-कुसगांव बुद्रुक पथकरनाका-वडगांव फाटामार्गे पुण्याकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. (Maval News) ही वाहतूक खंडाळा-कुसगांव पथकर नाकामार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुण्याकडे जातील.
२१ ते २३ ऑक्टोबर या तीन दिवसांत सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन वडगांव तळेगांव फाटा–लोणावळा–मुंबईकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती तळेगाव फाटा येथून उर्से खिंड, उर्से पथकरनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे जातील. (Maval News) नागरिकांनी वाहतूक बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Maval News : दहा तारखेच्या आत कामगारांना कामावर न घेतल्यास तळेगाव एमआयडीसी ठप्प करणार –
Maval News : विजेची तार अंगावर पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; मावळ तालुक्यातील घटना..
Maval News : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर ; वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय