शिरूर (Pune) : शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाने शेतातील कांदा काढण्यास मनाई करीत एकाचा चावा घेत मारहाण केली. आहे. सदर घटना कुरुळी (ता. शिरुर) येथील देशमुख वस्ती येथील शेतात घडली आहे. याबाबत मच्छिंद्र विनायक बोरकर (वय ५६ रा. कुरुळी देशमुख वस्ती ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी केरभाऊ विष्णू बोरकर (रा. कुरुळी देशमुख वस्ती ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मच्छिंद्र बोरकर यांच्या शेतात मंगळवारी (दि.२२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेत मजूर कांदा काढणी करीत होते. यावेळी त्यांचा चुलत भाऊ केरभाऊ बोरकर यांनी मजुराना कांदा काढण्यास मनाई केली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी केरभाऊ यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करीत चावा घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल गवळी हे करीत आहेत.