लोणी काळभोर, (पुणे) Loni Kalbhor Police News – वाहतूक पोलीस म्हणजे कुठल्याही कारणाने तुम्हाला अडवून तुमच्या कडून कमीत कमी ५० – १०० रुपये तरी घेणारच अशी प्रतिमा गेल्या काही वर्षात समाज माध्यमात तयार झाली आहे. (Loni Kalbhor Police News) चित्रपटातही ब-याच अंशी अशीच वाहतूक पोलीसाची प्रतिमा रंगवली जाते. (Loni Kalbhor Police News) या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे आमिष दाखवून ही एकही रुपया न घेता तब्बल साडे तीन कोटी रुपये जप्त करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राजेश पवार व सचिन कांबळे हे लोणी काळभोर वाहतूक शाखेतील दोन्ही कर्मचारी कौतुकास पात्र ठरले आहेत. (Loni Kalbhor Police News)
राजेश पवार व सचिन कांबळे या दोन्ही कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार
दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी राजेश पवार व सचिन कांबळे या दोन्ही कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करुन, त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
या संदर्भात सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. ८ मे रोजी रात्री लोणी काळभोर वाहतूक शाखेचे राजेश पवार व सचिन कांबळे वाहनांची नाकाबंदी करून पुणे सोलापूर महामार्गावर मांजरी ( ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयित वाहनाची तपासणी करत होते.
यावेळी महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने निघालेली एक गाडी संशयितरित्या आढळून आली. यावेळी पवार व कांबळे यांनी वाहनचालकाला गाडी बाजूला घ्यायला लावून त्याच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी त्या डिकीत काही बॅगा संशयास्पदरित्या आढळून आल्या. तत्काळ कांबळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत कळसकर यांना फोन करून माहिती दिली.
प्रशांत कळसकर यांना माहिती मिळताच, कळसकर यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन डिक्कीत असलेल्या बॅगा उघडून पाहिल्या. यावेळी नोटांचे बंडल दिसून आले. त्यानंतर गाडीसह संशयित इसमाला हडपसर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दोन पंचांसमक्ष पंचनामा करून वाहनात मिळून आलेल्या बॅगा तपासल्या. त्यामध्ये एकूण ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २२० रुपये मिळून आले. ही रोख रक्कम हडपसर पोलिसांच्या मदतीने मोजून दोन पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आली.
पुणे शहरातच नव्हे तर संपुर्ण राज्यात वहातुक पोलिसांच्याकडे पाहण्याचा दृष्ट्रीकोण सर्वानांच माहिती आहे. आपण सर्वच जण वेळोवेळी वाहतूक पोलीस पैसे घेतात म्हणून त्यांच्यावर जोरदार टीका करतो. मात्र या पार्श्वभूमीवर या दोघांनी केलेली कामगिरी हि खरंच प्रशंसनीय आहे. अशा सच्चाईने वागणा-या ठराविक लोकांमुळेच हा देश प्रगतीपथावर आहे. यापुढील काळात “साॅफ्ट टार्गेट” असणा-या पोलीसांवर टीका करताना काही पोलीस चांगले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर टोलनाका परिसरात तब्बल साडे तीन कोटींची रोकड जप्त ; चारचाकी गाडीसह एकाला अटक, पुणे शहर पोलिसांची कामगिरी…