Lonavala News : लोणावळा : लोणावळा येथील लायन्स पॉइंटजवळ एक व्यक्ती डोंगरमाथ्यावर कडेला उभी राहून “मी आत्महत्या करणार”, असे सतत बोलत होती. आजूबाजूचे नागरिक त्याला असे करण्यापासून परावृत्त करत होते. मात्र, कोणाचेही न ऐकता, ती व्यक्ती आपल्या मतावर ठाम होती. अखेर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. रेस्क्यू टीम याठिकाणी दाखल झाली. या टीमने देखील संबंधित व्यक्तीला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार पडू लागल्यानंतर ही व्यक्ती दिसेनासी झाली. ही घटना २५ सप्टेंबर रोजी घडली. त्यादिवशीपासून शोधकार्य सुरू होते. अखेर त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्याच्या हद्दीत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शिळावणे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो लोणावळा येथील रामनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (Lonavala News ) या व्यक्तीने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
लोणावळा परिसरातील लायन्स पॉइंट येथे ही व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी कठड्यावर थांबली होती. रेक्स्यू टीमच्या सदस्यांना देखील या व्यक्तीने दाद दिली नाही. (Lonavala News ) सायंकाळी या भागात अंधार पडल्यानंतर शिळावणे दिसेनासे झाले. त्यानंतर रेस्कयु टीमने शोधकार्य केले असता, त्याच्या शरीराचे वेगवेगळे भाग सापडले. प्रथम हाताचा पंजा आणि पाय सापडले, त्यानंतर मृतदेह रायगड जिल्ह्याच्या हद्दीत सापडला.
याबाबत माहिती देताना लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले की, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मिसींग असल्याची तक्रार दाखल केली होती. (Lonavala News ) संबंधित व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, तो अद्याप रायगड पोलिसांच्या ताब्यात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonavala News : लोणावळा हवाई दल परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Lonavala News : लोणावळ्यात फिरणाऱ्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा खाणीत बुडून मृत्यू..