Eknath Shinde | पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आता ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा होणार आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून मंगळवारी (ता. ११) दिली आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती २८ मे रोजी साजरी होते. हा दिवस ‘वीर स्मरण दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी वीर स्मरण दिन, म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News : शिवसेनेच्या लेटर पॅड वर फडणवीस यांची छबी
Pune News : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून तयार केली ५ हजार किलो मिसळ